आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या साऊथ सुपरस्टारकडे आहे 369 कार्स, देशातील पहिली मारुती खरेदी करण्‍याची इच्छा अपूर्णच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नईः सिनेविश्‍वातील कलाकारांच्या कार क्रेझशी सर्वजण परिचित आहेत. त्यांच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक महागड्या आणि लक्झरी कार्स असतात. मात्र तुम्हाला जाणून आश्‍चर्य वाटेल, की मळ्यालम आणि तमिळ सिनेमांमधील महानायक ममुटी यांच्याकडे एक नाही तर तब्बल 369 कार आहेत. इतकेच नाही तर काही वर्षांपूर्वी देशातील पहिली मारुती-800 ही खरेदी करण्‍याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. ममुटी यांनी आपल्या कार्ससाठी वेगळे गॅरेज बनवले आहे. यातील बहुतेक कार्स त्यांच्या बंगल्या भोवती पार्किंग केलेल्या दिसतील. ममुटी यांना कार चालवायला आवडते. ते बहुतेक वेळेस कारसोबत दिसले आहेत.

कलेक्शमध्ये आहेत या कार्स :
महानायक ममुटीकडे जग्वार XJ-L (कॅवियर) सर्वात लेटेस्ट मॉडेल कार आहे. तिचे दोन्ही व्हर्जन(पेट्रोल-डीझेल) त्यांनी खरेदी केले आहे. त्यांच्या बहुतेक कार्सवर 369 हा क्रमांक अवश्‍य असतो. या व्यतिरिक्त ममुटी यांच्या संग्रहात,
- टोयोटा लँड क्रूझर LC 200
- फरारी
- मर्सिडीज आणि ऑडीचे अनेक मॉडल
- पोर्श
- टोयोटा फॉरच्यूनर
- Mini Cooper S,
- F10 BMW 530d आणि 525d, E46 BMW M3
- Mitsubishi Pajero Sport,
- फोक्सवॅगन पॅसेट X2

आणि अनेक एसयूव्हीसह असंख्‍या गाड्या आहेत. ममुटी यांच्याकडे आइशरची एक कॅरावॅनही आहे. जी त्यांनी मॉडीफाय केली आहे. ममुटी हे दक्षिणेत ऑडी खरेदी करणारा पहिले अभिनेताही आहेत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, मारुती खरेदी करणार होते ममुटी आणि त्यांच्या 369 गाड्यांच्या संग्रहाविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...