आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 43 वर्षांचा झाला हृतिक, बघा भारताच्या या 'ग्रीक गॉड'चे आजवरचे 43 अवतार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा सुपरहीरो ऋतिक रोशनने आपल्या फिल्मी करिअरमध्ये भरपूर सिनेमांत अभिनय केला आहे. 2000 साली 'कहो ना प्यार हैं' या सिनेमाद्वारे हृतिक पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर हीरोच्या रुपात झळकला होता. हृतिकचा हा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला होता. 'कोई मिल गया', 'क्रिश', 'धूम 3', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'बँग बँग', 'अग्निपथ' यांसारखे सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला देणा-या अभिनेता हृतिक रोशनला भारताचा 'ग्रीक गॉड' म्हटले जाते.

हृतिकला 'कोई मिल गया' आणि 'क्रिश' या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड मिळाला आहे. 'धूम 2' या सिनेमासाठी त्याला 2006 साली फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला आहे. आता हृतिक लवकरच काबिल या सिनेमातू प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या 25 जानेवारी रोजी त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. यामी गौतमसोबत या सिनेमात तो रोमान्स करताना दिसणारेय.  
 
आज (10 जानेवारी) हृतिक 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याचे वेगवेगळे 43 लूक्स दाखवत आहोत. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये बघा त्याच्या लूक्सची खास झलक...