आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Super Hit Films Rejected By Kareena Kapoor Khan

INSIDE: 'कहो ना प्यार है'ची अमिषाला नव्हे बेबोला मिळाली होती ऑफर, नाकारले 5 हिट सिनेमे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('कहो न प्यार है' या सिनेमातील एका दृश्यात हृतिक रोशन आणि अमीषा पटेल, उजवीकडे करीना कपूर खान)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानला इंडस्ट्रीत नुकतीच 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2000 मध्ये दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांच्या 'रेफ्युजी' या सिनेमाद्वारे करीनाने बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली होती. खरं तर करीनाचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. मात्र करीनाची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री होऊ शकली असती.
झालं असं होतं, की दिग्दर्शक राकेश रोशन यांनी 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'कहो ना प्यार है' या सिनेमाची ऑफर पहिले करीनाला दिली होती. मात्र करीनाने हा सिनेमा नाकारुन 'रेफ्युजी'ची निवड केली. असेही म्हटले जाते, की करीना आणि हृतिकने या सिनेमाची शूटिंग सुरु केली होती, मात्र याचकाळात दोघांमध्ये जवळीक वाढत असल्याचे बघून राकेश रोशन यांनी तिला सिनेमातून काढून अमिषा पटेलला कास्ट केले. मात्र यात किती तथ्य आहे, हे राकेश रोशन आणि करीनालाच ठाऊक आहे.
'रेफ्युजी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, तर कहो ना प्यार है हा 2000 मधील सुपरहिट सिनेमा होता. करीनाने नाकारलेला हा एकमेव सुपरहिट सिनेमा नाहीये. या सिनेमासोबतच तिने आणखी काही हिट सिनेमे नाकारले आहेत. हे सिनेमे नाकारुन करीनाने करिअरमध्ये मोठी चूक केली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
करीनाने सुपहिट सिनेमे नाकारले असले तरी तिच्या स्टारडममध्ये काहीच कमतरता आलेली नाही. लवकरच ती सलमान खानसोबत 'बजरंगी भाईजान', अक्षय कुमारसोबत 'ब्रदर्स' आणि शाहिद कपूरसोबत 'उडता पंजाब'मध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशा चार सिनेमांविषयी ज्यामध्ये करीना सलमान, शाहरुख आणि रणवीर सिंह यांच्यासोबत झळकू शकली असती, मात्र तिने ते नाकारले...