आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Bollywood Stars Who Are More Successful Than Their Parents

करीना, आलियासह आई-वडिलांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत हे बॉलिवूड कलाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बबिता मुलगी करीना कपूरसोबत (फाइल) - Divya Marathi
बबिता मुलगी करीना कपूरसोबत (फाइल)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री बबिता शिवदासानी 68 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्म 20 एप्रिल 1948ला मुंबईत झाला. सिनेसृष्टीच्या करिअरमध्ये त्यांनी 19 सिनेमांत काम केले. बबिता यांनी 1966मध्ये आलेल्या 'दस लाख' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. मात्र, त्यांना मोठ्या ब्रेक निर्माते जीपी सिप्पी यांच्या 'राज' सिनेमातून मिळाला. सिनेमात त्यांच्या अपोझिट राजेश खन्ना होते. मात्र, हा सिनेमा चालू शकला नाही. परंतु बबिता यांचे करिअर या सिनेमाने सावरले.
सिनेमे सोडून, थाटले रणधीर कपूरसोबत लग्न...
'फर्ज', 'किस्मत', 'तुमसे अच्छा कौन है', 'हसीना मान जाएगी', 'अनजाना', 'कब क्यो और कहां', 'पहचान', 'कल आज और कल'सारख्य सिनेमांत काम केलेल्या बबिता यांना 1971मध्ये रणधीर कपूरसोबत लग्न केले. लग्नासाठी त्यांनी सिनेसृष्टीशी नाते तोडले आणि मुलगी करिश्मा आणि करीनाला जन्म दिला. मात्र, रणधीर आणि बबिता यांचे नाते जास्तकाळ टिकू शकले नाही. दोघे विभक्त झाले. तरीदेखील बबिता यांनी दोन मुलांचे संगोपन व्यवस्थित केले. त्यामुळेच करिश्मा आणि करीना बॉलिवूडच्या ए-लिस्ट अॅक्ट्रेस बनू शकल्या.
बबितापेक्षा त्यांच्या मुली लोकप्रिय...
प्रेम आणि कुटुंबासाठी बबिता यांनी सिनेमे सोडले होते. आज त्यांच्या मुली त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. धाकटी मुलगी करीनाविषयी बोलायचे झाले तर तिने 2000मध्ये आलेल्या 'रिफ्यूज' सिनेमातून करिअरला सुरुवात केली. मात्र, 'चमेली', 'देव', 'ओमकारा', 'जब वी मेट'सारख्या सिनेमांनी ती प्रसिध्दी झोतात आली. एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिल्यानंतर ती बॉलिवूडच्या हाईएस्ट पेड अॅक्ट्रेसमध्ये सामील झाली. करीनाची आई बबिताने केवळ 19 सिनेमांत काम केले. सिनेमांपेक्षा जास्त त्यांनी फॅमिलीवर जास्त फोकस केले. म्हणून त्या खास ओळख निर्माण करण्यात मागे पडल्या.
करीना-बबिता यांच्यासह बॉलिवूडमध्ये अनेक पालक आहेत, ज्यांची मुले त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहेत. कोण आहेत, जाणून घ्या पुढील स्लाइड्सवर...