आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

75th B\'day: एकेकाळी डिप्रेशनमध्ये होत्या आशा पारेख, केला होता आत्महत्येचा प्रयत्न, बघा Rare Pics

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गतकाळातील 'ज्युबली गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री आशा पारेख यांचा आज (2 ऑक्टोबर) 75 वा वाढदिवस आहे. आशाजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी गुजरात येथील महुआ येथे एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. त्यांचे वडील हिंदू तर आई मुस्लिम होत्या.

वयाच्या दहाव्या वर्षी अभिनयाला सुरुवात..
1959 मध्ये 'दिल देके देखो' या सिनेमाद्वारे हीरोईनच्या रुपात झळकलेल्या आशा पारेख यांची बालपणी डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र बालकलाकाराच्या रुपात संधी मिळाल्यानंतर आशा पारेख यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. 'आसमान' (1952) या सिनेमाद्वारे बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणा-या आशा पारेख यांना या सिनेमानंतर 'बेबी आशा पारेख' या नावाने ओळखले जाऊ लागले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर एका स्टेज प्रोग्राममध्ये त्यांच्या नृत्याने प्रभावित होऊन दिग्दर्शक बिलम रॉय यांनी त्यांना वयाच्या बाराव्या वर्षी 'बाप बेटी' या सिनेमात घेतले.

राजेश खन्नासोबत जमली ऑनस्क्रिन जोडी...
आशा पारेख यांनी आपल्या फिल्मी प्रवासात अनेक अभिनेत्यांबरोबर काम केल. मात्र त्यांची जोडी पसंत केली गेली ती अभिनेते राजेश खन्ना यांच्याबरोबर. 'कटी पतंग' या सिनेमात राजेश खन्ना यांच्या बरोबरची आशा पारेख यांची केमिस्ट्री लाजवाब होती. आशा पारेख यांनी शम्मी कपूर, शशी कपूर, देवानंद, अशोक कुमार, सुनील दत्त, राजेश खन्ना या नावाजलेल्या अभिनेत्यांबरोबर काम केल. शास्त्रीय नृत्यात त्या निपूण आहेत.

आशा पारेख यांचे प्रमुख सिनेमे
जब प्यार किसी से होता है (1961), घराना (1961), छाया (1961), फिर वही दिल लाया हूं (1963), जिद्‍दी (1964), मेरे सनम (1965), तीसरी मंजिल (1966), लव इन टोक्यो (1966), आये दिन बहार के (1966), उपकार (1967), महल (1969), कन्यादान (1969), आया सावन झूम के (1969), नया रास्ता (1970), कटी पतंग (1970), आन मिलो सजना (1970), मेरा गांव मेरा देश (1971), राखी और आंदोलन (1995).

विजय भट्ट यांनी टॅलेंटवर उपस्थित केली शंका...
'गुंज उठी शहनाई' या सिनेमाचे दिग्दर्शक विजय भट्ट यांनी आशा पारेख यांच्या टॅलेंटवर शंका उपस्थित केली होती. त्यांच्यात स्टार अपील नसल्याचे सांगून त्यांनी त्यांना आपल्या सिनेमात कास्ट करण्यासाठी नकार दिला होता.
 
आत्महत्येचा केला होता विचार... 

आत्महत्येचा केला होता विचार... 
आशा पारेख यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, 'आईवडिलांच्या निधनानंतर मी एकटी पडले होते. सर्वच गोष्टी माझ्या मलाच मॅनेज कराव्या लागायच्या. एकटेपणामुळे मला प्रचंड नैराश्य आले होते. त्यामुळे आत्महत्येचा विचारसुद्धा माझ्या मनात आला होता. पण योग्य औषधोपचारामुळे मी डिप्रेशनमधून बाहेर पडले. कलाकारांना चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळत असतं. पण तरीदेखील कलाकारांना अनेकदा एकेटपणाचा सामना करावा लागतो."

अविवाहित राहिल्या...
अनेक अभिनेत्यांबरोबर पडद्यावर रोमान्स करणा-या आशा पारेख यांना त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र प्रेम प्राप्त होऊ शकले नाही. त्यांनी लग्न केले नाही. दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्याबरोबर आशा पारेख यांच्या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीत खूप रंगली. स्वतः आशा यांनी ही गोष्ट स्वीकारली होती. नासिर हुसैन अभिनेता आमिर खानचे काका होते.

अनेक पुरस्कारांच्या ठरल्या मानकरी...
आशा पारेख यांना करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. 'कटी पतंग' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार (1970) , पद्मश्री सन्मान (1992), जीवनगौरव पुरस्कार (2002), भारतीय सिनेमांतील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी सन्मान (2006), भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळ महासंघ (फिक्की)च्या वतीने लिविंग लेजेंड सन्मान मिळाला.

दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल...
फिल्म इंडस्ट्रीत प्रमुख अभिनेत्रीची भूमिका मिळणे बंद झाल्यानंतर त्यांनी अभिनयापासून सन्यास घेतला. त्यानंतर 1990 मध्ये 'ज्योती' या गुजराती मालिकेच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. 'आकृती' या नावाने स्वतःची प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली. 'कोरा कागज', 'पलाश के फूल', 'बाजे पायल' या मालिकांची त्यांनी निर्मिती केली.
 
मुंबईतील रुग्णालयाला आशा पारेख यांचे नाव...
आशा पारेख यांच्या नावाने मुंबईतील सांताक्रूज येथे एक रुग्णालयसुद्धा असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. त्यांच्या कल्याणकारी सामाजिक कार्यांच्या आधारावर या रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले. याशिवाय 'कला भवन' या नावाने त्यांनी स्वतःची डान्स अकॅडमीसुद्धा आहे.

आशा पारेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांची खास छायाचित्रे दाखवत आहोत.. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आशा पारेख यांची जुनी छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...