आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Bollywood Celebrity Couples Who Are Separated But Not Divorced

भेटा बी टाऊनच्या अशा 8 सेलिब्रिटी कपल्सना जे घटस्फोट न घेताच कायमचे झाले विभक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः डावीकडे - कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी, उजवीकडे (वर) - करण सिंह ग्रोवर आणि जेनिफर विंगेट, (खाली) गुलजार आणि राखी - Divya Marathi
फाइल फोटोः डावीकडे - कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी, उजवीकडे (वर) - करण सिंह ग्रोवर आणि जेनिफर विंगेट, (खाली) गुलजार आणि राखी

आजच्या काळातही लोक लव्ह मॅरेजपेक्षा अरेंज्ड मॅरेजला विशेष प्राधान्य देताना दिसतात. मात्र ग्लॅमर इंडस्ट्रीविषयी बोलायचे झाल्यास, येथील तारे-तारका आपला जोडीदार स्वतःच निवडणे पसंत करतात. पण बॉलिवूडमध्ये असेही काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांना प्रेमात नेहमीच अपयश मिळाले आहे. मात्र पहिले प्रेम सहजासहजी विसरणे शक्य नाही, असे म्हटले जाते. कितीही प्रयत्न केला, तरी व्यक्तींना पहिल्या प्रेमाचा विसर पडत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत, ज्यांनी लग्न तर थाटले मात्र तू तू मैं मैं निर्माण झाल्यावर ते विभक्त झाले. मात्र विभक्त होताना त्यांनी कायदेशीर मार्गांचा अवलंब केला नाही. अर्थातच हे सेलिब्रिटी घटस्फोट न घेता विभक्त झाले आहेत.
याचे अलीकडचे उदाहरण म्हणजे अभिनेता रणवीर शौरी आणि त्याची पत्नी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा. या दोघांनीही अलीकडेच सांमजस्याने विभक्त होत असल्याची घोषणा केली. 2008 पासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. 2010 मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. या दोघांचा एक मुलगा असून हारुन हे त्याचे नाव आहे. मुलाच्या जन्मानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. अखेर यावर्षी 14 सप्टेंबरला दोघांनी विभक्त होत असल्याची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली. मात्र सदैव मुलाचे को-पॅरेंट्स असू, असेही त्यांनी सांगितले. हे दोघे आता वेगळे राहात असून दोघांचा घटस्फोट झालेला नाही.
रणवीर आणि कोंकणाप्रमाणे विभक्त झालेल्या मात्र घटस्फोट न घेतलेल्या आणखी काही सेलिब्रिटींविषयी जाणून घ्या, पुढील स्लाईड्समध्ये...