एन्टरटेन्मेंट डेस्कः 2015 हे वर्ष सिनेमांसाठी धमाकेदार ठरले. या वर्षात 'बाहुबली', 'बजरंगी भाईजान', 'दिलवाले', 'प्रेम रतन धन पायो' यांसारख्या सिनेमांनी अनेक विक्रम रचले व बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला. 2016 या नवीन वर्षांतही सिनेमांची अशीच धूम अशीच सुरु राहणार आहे. विशेष म्हणजे या वर्षभरात अनेक सुपरहिट सिनेमांचे सिक्वेल्स प्रदर्शित होणार आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल नऊ सिनेमांचे सिक्वेल यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. कोणकोणत्या सिनेमांचे पुढील भाग यावर्षभरात बॉक्स ऑफिसवर दाखल होत आहेत, याचाच आम्ही घेतलेला हा आढावा...
'क्या कूल है हम 3'
येत्या 22 जानेवारीला एकता कपूरची निर्मिती असलेल्या 'क्या कूल है हम' या सिनेमाचा तिसरा भाग 'क्या कूल है हम 3' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात तुषार कपूर, आफताब शिवदासानी आणि मंदना करीमी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचा पहिला भाग 'क्या कूल है हम' 2005 मध्ये तर दुसरा भाग 'क्या सुपरकूल है हम' 2012 मध्ये रिलीज झाला होता. 'क्या कूल है हम'च्या पहिल्या दोन भागांत तुषार कपूर आणि रितेश देशमुख झळकले होते. मात्र तिस-या भागात तुषार आणि आफताब ही जोडी पडद्यावर दिसणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आणखी कोणत्या सात सिनेमांचे सिक्वेल यावर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत...