आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्तापर्यंत 129 कोटींचा बिझनेस करणा-या \'प्रेम रतन...\'मध्ये झाल्या आहेत या 9 MISTAKES

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एन्टरटेन्मेंट डेस्कः सलमान खान स्टारर \'प्रेम रतन धन पायो\' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. पहिल्या वीकेण्डला या सिनेमाने 129 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.  मात्र तरीदेखील काही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात हा सिनेमा अपयशी ठरला आहे. 
 
समीक्षकांच्या मते, सिनेमाना ताणला गेला आहे. शिवाय काही सीन्सची गरज नसताना उगाचच त्याचा भडीमार सिनेमात करण्यात आला आहे. दिग्दर्शकाची सिनेमावरची पकड सैल ठरल्यामुळे हा सिनेमा अनेकांना दहा मिनिटेसुद्धा खिळवून ठेवू शकलेला नाही. काही मोठ्या चुकासुद्धा सिनेमात झाल्या आहेत. त्या आज आम्ही वाचकांच्या निदर्शनास आणून देत आहोत. 
 
 
1. सलमान खानने प्रीतमपूरच्या ज्या राजकुमाराची भूमिका वठवली आहे, त्याच्याकडे रोल्स रॉयल्स, मर्सडीज सारख्या महागड्या कारचा ताफा आहे. मात्र अपघाताच्या वेळी तो कारने नव्हे तर बग्गीतून आपल्या सावत्र बहिणींना भेटायला जातो. सिनेमात अपघाताचे दृश्य बग्गीऐवजी कारमध्येही चित्रीत करणे खरं तर शक्य होते. कारने अपघात घडवून नंतर सलमानला वाचवता येणे शक्य झाले असते. बग्गीतूनच हा अपघात का घडवून आणला? याचे उत्तर केवळ दिग्दर्शकच देऊ शकतो. 
 
2. अपघाताच्या सीनमध्ये जेव्हा सलमान पहाडावरुन खाली कोसळतो, तेव्हा स्लो मोशनमध्ये बग्गी खाली पडताना दाखवण्यात आले आहे. मात्र या सीनमध्ये घोडे जणू अदृश्यच झाले. वेगवान पळणारे घोडे अचानक पहाडाच्या टोकाजवळच येऊन कसे थांबले असावे, हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. 
 
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी 7 चुकांविषयी....