90च्या दशकात 'आशिकी' सिनेमाने चर्चेत आलेली अनु अग्रवालने मृत्यूच्या दारातून परत आल्याची कथा आणि आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक महत्वाच्या गोष्टी आत्मकथेच्या माध्यमातून मांडल्या आहेत. मागील दिवसांत तिने नवी दिल्लीमध्ये 'अनयुज्युअल: मेमोरी ऑफ ए गर्ल हू केम बॅक फ्रॉम डेड' या पुस्तकाविषयी सांगितले. तिने सांगितले, 'ही कहाणी अशा तरुणी आहे, जिचे आयुष्य अनेक भागांत विभागले गेले आणि नंतर तिने त्याच तुकड्यांना एकत्र करून आयुष्य उभे केले.'
आठ हिंदी सिनेमांमध्ये काम केल्यानंतर 1999मध्ये तिचा अपघात झाला आणि 29 दिवस ती कोमात गेली. या घटनेने अनुचे आयुष्य आणि करिअरच पालटले. अनु कोमात असल्याने तिला स्वत:चा पूर्णत: विसर पडला आणि ती आपली भाषादेखील विसरली होती. तिला अर्धांगवायूसुध्दा झाला होता. परंतु दिर्घकाळाच्या उपचारानंतर ती या दुखण्यातून बाहेर पडण्यास यशस्वी झाली. मित्र आणि कुटुंबीयांच्या मदतीने पुन्हा तिने इंग्रजी आणि हिंदी भाषा शिकून घेतली. त्या दिवसांमध्ये अनु मुलांना योगा आणि व्यायाम शिकवत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, तिच्या आयुष्याविषयी काही गोष्टी...