आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका अफेअरने उद्धवस्त झाले या अॅक्ट्रेसच्या मुलीचे करिअर, आता चित्रपटांपासून आहे दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी आणी नव्वदीच्या दशकातील अभिनेत्री प्रतिभा सिन्हा तिच्या करिअरपेक्षा जास्त तिच्या प्रेमप्रकरणामुळे जास्त चर्चेत राहिली. 4 जुलै 1969 रोजी कोलकाता येथे जन्मलेली प्रतिभाने तिच्या करिअरची सुरुवात 1992 साली 'मेहबूब मेरे मेहबूब' मधून केली होती. यात तिच्यासोबत अभिनेता सुजॉय मुखर्जीने भूमिका केली होती. त्याचवेळी प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवण मधील नदीम सैफीवर प्रतिभाचा जीव जडला होता. नदीमवर गुलशन कुमारच्या हत्येचा आरोप आहे. नदीम आणि प्रतिभा नेहमी कोडवर्डमध्ये बोलत असत असे सांगण्यात आले. 
 
- सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभाची आई माला सिन्हाला नदीम अजिबात आवडत नसे. अफेअरबद्दल कोणाला माहिती पडू नये म्हणून दोघे कोडवर्डमध्ये बोलत असत. 
- प्रतिभाचे कोड नेम 'Ambassador' तर नदीमचे कोडनेम 'Ace'होते. जेव्हा दोघांच्या या कोडवर्डबद्दल सर्वांना माहित पडले तेव्हा त्यांनी ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली दिली. 
- नदीम पहिल्यापासून विवाहित आहे हे प्रतिभाला माहित असूनही ती त्याच्यावर प्रेम करत होती. 
- माला सिन्हाला प्रतिभाने नदीमसोबत कोणतेही रिलेशन ठेवू नये असे वाटत होते. यासाठी त्यांनी प्रतिभाला चेन्नईला पाठवले. 
- नदीमसोबत असलेल्या अफेअरमुळे प्रतिभाचे फिल्मी करिअरही चांगले चालत नव्हते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, जेव्हा प्रतिभाने नदीमसोबत लग्न करणार असे सांगितले..
बातम्या आणखी आहेत...