आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलिशा, बाबा सहगलसह हे आहेत 90 च्या दशकातील हिट पॉप स्टार्स, आता आहे अज्ञातवासात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पॉप सिंगर अलिशा आणि बाबा सहगल) - Divya Marathi
(पॉप सिंगर अलिशा आणि बाबा सहगल)
90 च्या दशकात पॉप गाण्यांचा बोलबाला होता. प्रत्येकजण त्यांचा चाहता होता. याकाळात जेवढे पॉप स्टार्स उदयाला आले, ते सर्व यशोशिखरावर पोहोचले. गायिका अलिशा चिनॉय, बाबा सहगल, फाल्गुनी पाठक, श्वेता शेट्टी, लकी अलीसह असे बरेच गायक-गायिका आहेत, ज्यांनी त्याकाळात आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र आज हे सर्व पॉप स्टार्स केवळ आठवणींचा भाग बनले आहेत. यापैकी बरेच जण आज लाइमलाइटमध्ये नाहीयेत.
आज आम्ही तुम्हाला 90 च्या दशकात उदयाला आलेल्या मात्र आज अज्ञातवासात असलेल्या या पॉप स्टार्सविषयी सांगत आहोत...
अलिशा चिनॉय
इंडियन पॉप सिंगर अलिशा चिनॉयला कुणीही विसरु शकत नाही. तिने गायलेले 'मेड इन इंडिया' हे गाणे खूप गाजले होते. अलिशाचे अनेक म्युझिक अल्बम्स आलेत. मात्र आज अलिशा लाइमलाटपासून दूर गेली आहे.
बाबा सहगल
90 च्या दशकात बाबा सहगलची क्रेझ खूप होती. त्याने गायलेली 'आजा मेरी गाड़ी में बैठ जा', 'ठंडा ठंडा पानी' ही गाणी खूप हिट झाली होती. मात्र आज बाबा सहगल कुठे आहे, हा त्याच्या चाहत्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी अशाच काही सिंगर्सविषयी...