Home »Gossip» 90s Popular Actress Sonu Walia Interesting Facts

या अभिनेत्रीला अज्ञात इसम पाठवायचा अश्लील व्हिडिओ, असे आहे खासगी आयुष्य

दिव्य मराठी वेब टीम | Jul 15, 2017, 08:36 AM IST

मुंबईः सिनेजगतात काम करण्याचे आकर्षण भल्याभल्यांना सुटत नाही. पण या चंचल दुनियेत टिकणे मात्र अवघड असते. 'खून भरी मांग'सारख्या चित्रपटात रेखासारख्या अभिनेत्रीसमोर उत्तम अभिनय करणारी सोनू वालिया दीर्घ काळ पडद्यावर टिकेल, असे वाटत होते. पण तसे झाली नाही. 80 आणि 90च्या दशकात सिनेसृष्टीत सोनूने स्वतःची वगेळी ओळख निर्माण केली. 30 हून अधिक सिनेमांत अभिनयदेखील केला. पण ब-याच काळापासून ती सिनेसृष्टीपासून दुरावली आहे.
एक अज्ञात इसम करायचा अश्लील फोन कॉल...
- याचवर्षी मार्च महिन्यात 53 वर्षीय सोनू वालियावर पोलिसांकडे धाव घेण्याची वेळ आली होती.
- झाले असे, की एका अज्ञात व्यक्तीने सोनू वालियासोबत फोनकरून असभ्य भाषेत संवाद साधला. तसेच, तिला काही अश्लील व्हिडिओदेखील पाठवले.
- आठवड्याभर या व्यक्तीने फोनवरून तिला त्रास दिला. पण, सदर प्रकरण थांबत नसल्याचे पाहून सोनू वालियाने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
- सदर प्रकार थांबवण्याची तंबी देऊनही अज्ञात व्यक्तीने उलट तिला आणखीनच त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच, ती व्यक्ती तिला प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्रास देत होती. अखेर सोनू वालियाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती.

पुढे वाचा, बी-ग्रेड सिनेमांमध्ये केलंय सोनू वालियाने काम...

Next Article

Recommended