आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि ही ठरली आईसोबतची जान्हवीची शेवटची बाइक राइड, पाहा व्हिडिओ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारीला निधन झाले. बुधवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या मुलींना खुप मोठा धक्का बसला आहे. त्यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. लेकीच्या पदार्पणामुळे श्रीदेवी खुप उत्सूक होत्या. त्यांनी जान्हवीला चित्रपटांसाठी सज्ज करुन ठेवले होते.

 

जान्हवीच्या पदार्पणासाठी उत्सूक होत्या श्रीदेवी
श्रीदेवी या जान्हवीच्या 'धडक' या चित्रपटासाठी खुप उत्सूक होत्या. त्या अनेक वेळा तिच्यासोबत शूटिंग सेटवर जायच्या. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून जान्हवी तिच्या भूमिकेसाठी मेहनत घेत होती आणि यासाठीच ती बाईक चालवण्यास शिकत होती. तिच्या या सरावात श्रीदेवीसुद्धा साथ देत होत्या. लेकीसोबतच्या बाईक राइडचा अखेरचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत जान्हवी बाईक चालवण्यास शिकत आहे आणि श्रीदेवी तिच्यामागे तिला आत्मविश्वास देण्यासाठी बसल्याचे पाहायला मिळत आहे. जान्हवी आपली आई श्रीदेवीला तिच्या ओशिवरा इमारतीच्या आवारात बाईकवर राइड मारायला न्यायची. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवी आणि जान्हवीचा शेवटचा बाइक राइड व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...