आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी असा दिसायचा आमिर, 53 व्या वाढदिवसापुर्वी पाहा त्याचे RARE PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खान - Divya Marathi
आमिर खान

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 53 वर्षांचा होणार आहे. त्याचा जन्म 14 मार्च, 1965 मध्ये मुंबई येथे झाला होता. आमिर सध्या आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदूस्तान' चित्रपटाच्या शूटिंगसाठी जयपुरमध्ये आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिताभ बच्चनही आहेत. पहिल्यांदाच हे दोन सुपरस्टार एक स्क्रीन शेअर करतील. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला आमिरचे काही रेअर फोटोज दाखवणार आहोत.


चाइल्ड आर्टिस्ट म्हणून केला होता डेब्यू
आमिर खानने बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात 1973 मध्ये केली होती. 'यादो की बारात' हा त्याचा पहिला चित्रपट होता. 1988 मध्ये फक्त वयाच्या 23 व्या वर्षी त्याने 'कयामत से कयामत तक' मधून आफल्या फिल्मी करिअरची सुरुवा केली होती. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आमिरने 'दिल', 'दिल है कि मानता नहीं', 'जो जीता वही सिकंदर', 'हम हैं राही प्यार के', 'अंदाज अपना-अपना', 'रंगीला', 'राजा हिंदुस्तानी', 'इश्क', 'गुलाम', 'अर्थ', 'सरफरोश', 'दिल चाहता है', 'लगान', 'मंगल पांडे', 'फना', 'गजिनी', '3 इडियट्स', 'धूम-3' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

 

केले दोन लग्न
आमिर खानने दोन लग्न केलेय. त्याचे पहिले लग्न रीना दत्ता हिच्यासोबत झाले होते. रीना, आमिर शेजारी राहायचे. दोघांना प्रेम झाले आणि त्यांनी पळून जाऊन लग्न केले. लग्नाच्या वेळी आमिर 21 वर्षांचा होता तर रिना 20 वर्षांची होती. परंतू 16 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. यानंतर आमिरने दुसरे लग्न किरण रावसोबत केले. या दोघांना एक मुलगा आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आमिर खानचे काही रेअर फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...