आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरॅशमेंटला बळी ठरली होती इलियाना डिक्रूज, स्वतः व्यक्त केले दुःख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या आगामी चित्रपट 'रेड' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 16 मार्चला हा चित्रपट रिलीज होतोय. यामध्ये अजय देवगनसोबत ती स्क्रीन शेअर करत आहे. यापुर्वी इलियाना, अजयसोबत 'बादशाहो' मध्ये दिसली होती. 'रेड' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये इलियानाने divyamarathi.com शी बातचीत केली. यावेळी तिने आपल्या आयुष्याविषयी काही गोष्टी सांगितल्या.


हरॅशमेंटला बळी ठरली आहे इलियाना...
इलियानाने आपल्या आयुष्याचा एक इंसीडेंट शेअर करत सांगितले की, ती हरॅशमेंटची बळी ठरली आहे. तिने सांगितले की, ती 15 वर्षांची असताना आईसोबत गोव्यात राहायची. ती बसने ये जा करायची. याच काळात एक मुलगा तिला नेहमी त्रास द्यायचा. त्या मुलाचे प्रपोजल नाकारल्यानंतर तो तिला जास्त त्रास देऊ लागला. तो इलियानाचे नाव घेऊन ओरडायचा. तो मुलगा तिला सतत 3 महिने त्रास देत होता.


आईकडे केली तक्रार
इलियाना म्हणाली की, ती रोज-रोज त्या मुलाच्या वागण्यामुळे त्रस्त झाली होती. तिने त्या मुलाविषयी आईला सांगितले. आई त्या मुलाला भेटली आणि समजावले. आईने त्याला पोलिसात तक्रार करेल अशी धमकीही दिली. परंतू त्या मुलाला वाटले की, आई थट्टा करतेय. तो त्रास देतच राहिला. यानंतर आम्ही पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी त्याला चांगलेच मारले. यानंतर पुन्हा त्याने असे काही केले नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इलियानाचे 'रेडॉ' चित्रपटातील काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...