आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरा आणि मुलीला पसंत नाही राणीचा मेकअप, घरी पोहोचताच मिळते ही ऑर्डर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री राणी मुखर्जी 4 वर्षांनंतर 'हिचकी' चित्रपटातून कमबॅक करत आहेत. हा चित्रपट 23 मार्चला रिलीज होईल. अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणा-या राणीने मुलीला जन्म दिल्यानंतर चित्रपटातून ब्रेक घेतला होता. आता ती कमबॅक करतेय. परंतू ती आता आपली प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ बॅलेंस करुन चालतेय. नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत राणीने आपल्या वयक्तीक आयुष्याविषयी काही गोष्टी शेअर केल्या. तिने सांगितले की, ती जेव्हा काम करुन घरी परतते तेव्हा तिचा नवरा आदित्य चोप्रा आणि मुलगी अदिरा त्यांना सर्वात पहिले एक काम करायला सांगतात.

 

हे काम सांगतात आदित्य-अदिरा
राणीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, मी घरी पोहोचताच आदित्य आणि अदिरा मला सर्वात पहिले मेकअप काढायला सांगतात. दोघांनाही मला मेकअपमध्ये पाहायला आवडत नाही. राणीने सांगितले की, एकदा मी 'हिचकी' चित्रपटाचे प्रमोशन करुन घरी गेले. तेव्हा अदिराने मला विचारले की, 'मम्मा तु शूटिंगवर गेली होतीस', मी हो म्हणाले. मग ती म्हणाली की, 'मेकअप काढलास का' आदिरा आता मोठी होत आहे. तिला गोष्टी कळत आहेत. मला विनामेकअप पाहणे तिला आवडत नाही. 


आदिरा झोपल्यावर मी कामावर जाते
राणीने सांगितले की, दूपारच्या वेळी मी कामासाठी बाहेर पडते. कारण दूपार हा आदिराची झोपण्याची वेळ असते. येवढेच काय तर मी सकाळी-सकाळीही शूटिंगवर निघते तेव्हाही आदिरा झोपलेली असते. अशावेळी ती मला मिस करत नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा राणी आणि तिच्या फॅमिलीचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...