आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जया-डॅनीचा बॅचमेट होता हा अॅक्टर, एका घटनेनंतर उरले नाहीत उपचारांसाठीही पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/लुधियानाः पंजाबी चित्रपटांमधील अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जाणारे 64 वर्षीय अभिनेते सतीश कौल आज अज्ञातवासात जीवन व्यतित करत आहेत. सतीश कौल यांनी पुण्याच्या FTII मधून अभिनयाचे धडे गिरवले. ते जया बच्चन आणि डॅनी यांचे बॅचमेट होते. कर्मा या गाजलेल्या चित्रपटात झळकलेले सतीश दीर्घ काळापासून आजारी असून त्यांच्याकडे उपचारांसाठीही पैसे राहिलेले नाहीत. 300हून अधिक सिनेमांत त्यांनी काम केले. करिअरमध्ये त्यांनी दिलीप कुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसह अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. मात्र आज त्यांच्याकडे राहायला स्वतःचे घर नाही की खायला अन्न नाही.


बाथरुममध्ये पडल्याने मोडले हाड... 
- जुलै 2014 मध्ये बाथरुममध्ये पडल्यानंतर सतीश यांचे स्पायनल फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे ते दीर्घ काळ रुग्णालयात होते. बरे होऊनदेखील त्यांना रुग्णालयातच दिवस काढावे लागत आहे. त्याचे कारण म्हणजे रुग्णालयाच्या बाहेर त्यांच्याकडे राहायला जागा नाही.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, ''पूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होतो. मात्र उपचारांसाठी पैसे नसल्याने मला पटियालातील एका छोट्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.''

 

अॅक्टिंग स्कूलमुळे आले रस्त्यावर... 

काही वर्षांपूर्वी सतीश कौल यांनी मुंबई सोडली आणि ते लुधियानामध्ये स्थायिक झाले. सिनेसृष्टीतून कमावलेल्या पैशांतून त्यांनी लुधियानामध्ये एका 'अभिनय शाळा' सुरू केली. परंतु, त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातून त्यांना आर्थिक फटका बसला आणि एक असाही क्षण आला जेव्हा खाण्या-पिण्याचीही अडचण समोर दिसू लागली. 


पुढे वाचा, वाईट काळात पत्नीने सोडली साथ..

बातम्या आणखी आहेत...