आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी-खुशीवर कमेंट्स करणा-यांवर भडकली श्रीदेवीची सावत्र मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर वडील बोनी कपूरला साथ देत आहेत. हे दोघंही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. यामुळे सर्वच त्यांची प्रशंसा करत आहे. येवढेच नाही तर अशुला आणि अर्जुन यांनी आपसातील कटूता विसरुन सावत्र बहिण जान्हवी आणि खुशी कपूरला धक्क्यातून सावरण्यात मदत करत आहेत. नुकतेच अंशुलाने इंस्टाग्रामवर जान्हवी आणि खुशीवर वाईट कमेंट करणा-यांना सडेतोड उत्तर दिसेल. 

 

लिहिली अशी सोशल पोस्ट
अंशुलाने आपल्या सोशल अकाउंटवर एक पोस्ट लिहिली. यामध्ये ती म्हणाली की प्रत्येक परिस्थितीचा खंबीरपणे सामना करावा. याच पोस्टवर अर्जुन कपूरच्या फॅनने जान्हवी आणि खुशी कपूरवर वाईट कमेंट्स केले. फॅन्स बोनी कपूरलाही वाईट बोलले. हे पाहून अंशुला भडकली आणि तिने वडील-बहिणीवर फॅन्सने केलेली कमेंट डिलीट केली.

 

असे दिले उत्तर
अंशुलाने उत्तरात लिहिले की, 'तुम्हाला विनंती आहे की, माझ्या बहिणींसाठी चुकीच्या भाषेचा वापर करु नका. मी हे सहन करु शकत नाही यामुळे मी ही कमेंट डिलीट केली. माझा भाऊ अर्जुन कपूरच्या तुमच्या प्रेमासाठी मी तुमची आभारी आहे. तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद'

 

शूटिंगमध्ये व्यस्त आहे अर्जुन
अर्जुन कपूरने पंजाबमध्ये 'नमस्ते इंग्लंडची शूटिंग सुरु केली आहे. तर अंशुला आपल्या वडीलांसोबत आहे. सावत्र आई श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन कपूर शूटिंग मधेच सोडून मुंबईला परतला होता. येवढेच नाही तर अर्जुन कपूर श्रीदेवीचे पार्थिव घेण्यासाठी दुबईला गेला होता. अंत्यसंस्कारावेळी अर्जुनने श्रीदेवीच्या अर्थीला खांदा दिला होता.'


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...