आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'परी' चित्रपटासाठी असा झाला अनुष्काचा मेकअप, समोर आले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : अनुष्का शर्माचा 'परी' चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झालाय. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची सुरुवात थोडी धिम्या गतीने झाली. दोन दिवसात चित्रपटाने फक्त 9 कोटींची कमाई केलीये. चित्रपटातील अनुष्काच्या लुक चर्चेचा विषय बनलाय. अनुष्काच्या करीअरमधल्या पहिल्या चित्रपटात ती इतकी भितीदायक दिसली आहे. तिने या लुकसाठी खुप मेहनत केली. तिला हा लुक मेकअप आर्टिस्ट क्लोवर वुटनने दिला.


व्हायरल होत आहे फोटो
चित्रपटातील अनुष्काच्या लुकचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे फोटो व्हायरल होत आहेत त्यामध्ये अनुष्काच्या चेह-यावर डाग दिसत आहे. हे डाग तिने मेकअपच्या माध्यमातून बनवले आहेत. चित्रपटात तिचे वेगवेळे लुक आहेत. तिची मेकअप आर्टिस्ट क्लोवर वुटनने सांगितले की, 'अनुष्कासोबत त्यांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तेव्हा ती रणबीर कपूरसोबत एका चित्रपटात काम करत होते. त्यांना माझे काम आवडले आणि त्यांनी डायरेक्टर प्रोसित रॉयला माझाय नंबर दिला. आणि अशा प्रकारे मला 'परी' मध्ये काम करण्याची संधी मिलाली. परीमध्ये अनुष्काला भितीदायक लुकमध्ये दाखवायचे होते. पहिले मी अनुष्काच्या त्वचेवर काम केले. मी त्यांना विनामेकअप पाहिले, त्यांची स्किन खुप चांगली आहे. यामुळे त्यावर काम करणे सोपे होते.'

 

हे आहेत अनुष्काचे अपकमिंग चित्रपट
अनुष्का सध्या वरुण धवनसोबत 'सुई-धागा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती शाहरुख खानसोबत 'झिरो' चित्रपटातही दिसणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अनुष्का शर्माच्या मेकअप लुकचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...