आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arjun Kapoor Birthday Special Films Stars Went Fat To Fit 140 किलो होते अर्जुन कपूरचे वजन, सिनेसृष्टीतील पदार्पणापूर्वी हे स्टार्ससुद्धा होते Fat

​B\'day: 140 किलो होते अर्जुन कपूरचे वजन, सिनेसृष्टीतील पदार्पणापूर्वी हे स्टार्ससुद्धा होते Fat

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2012 मध्ये 'इश्कजादे' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री घेणारा अभिनेता अर्जुन कपूर आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुन हा चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा आहे. 26 जून 1985 रोजी मुंबईत मोना आणि बोनी कपूर यांच्या घरी अर्जुनचा जन्म झाला. सिनेसृष्टीतील पदार्पणापूर्वी अर्जुनचे तब्बल 140 किलो वजन होते. पण मेहनत करुन त्याने वजन कमी केले आणि सिनेसृष्टीत पदार्पण केले. 


कसे कमी केले वजन?
अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करणारा अर्जुन एकेकाळी मात्र येथे काम करण्याच्या परिस्थितीत नव्हता. याचे कारण होते त्याचे वाढलेले वजन. आपल्या आकर्षक लूकने तरुणींना भूरळ घालणा-या अर्जुनचे वजन एकेकाळी तब्बल 140 किलो इतके होते. फिल्मी दुनियेत पदार्पण करण्यासाठी अर्जुनने जवळपास 65 किलो वजन कमी केले. यावरुन अर्जुनने वजन कमी करण्यासाठी किती घाम गाळला असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकाल. एका मुलाखतीत अर्जुनने वजन कमी करण्याचे रहस्य उघड केले होते. अर्जुनने सांगितले, की तो एका महिन्यात दहा किलो वजन कमी करायचा. याकाळात वजन कमी जास्त होत होते. वजन कमी करण्यासाठी अर्जुनने क्रॉस फिट एक्सरसाईज सुरु केली. हा व्यायाम 20 मिनिटांचा असतो. अभिनेता हृतिक रोशनसुद्धा हा व्यायाम करणे पसंत करतो.


एका वेळी तीन बर्गर खायचा अर्जुन-
एकेकाळी अर्जुन तीन बर्गर एकत्र खायचा. मात्र आता त्याने आपल्या डाएटवर विशेष लक्ष केंद्रित केलेल असून जंक फूड खाणे बंद केले आहे.


पुढील स्लाईड्सवर वाचा, अशाच आणखी काही सेलिब्रिटींविषयी ज्यांनी कमी केले वजन...  

 

बातम्या आणखी आहेत...