आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या मृत्यूच्या 10 दिवसांनंतर व्यक्त झाला अर्जुन, शेअर केल्या मनातील भावना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड  अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या 10 दिवसांनंतर शेवटी सावत्र मुलगा अर्जुन कपूने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत IM Drake च्या ओळी लिहिल्या.  'you're brave because life gives you every reason to want to give up and still, you rise, you pick yourself up and carry on'. या ओळी पोस्ट करत त्याने  'One day at a time..' असे कॅप्शन दिले. त्याच्या या पोस्टमुळे फॅन्स त्याची खुप स्तूती करत आहेत


श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी ऐकून शूटिंग सोडून आला होता अर्जुन
अर्जुन कपूर आपला आगामी चित्रपट 'नमस्ते इंग्लंड' ची शूटिंग अमृतसरमध्ये करत आहे. ज्या आईचा त्याने आयुष्यभर तिरस्कार केला. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून तो शूटिंग मधेच सोडून मुंबईत आला होता. येवढेच नाही तर त्याने सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशीला सख्ख्या भावाप्रमाणे साथ दिली. श्रीदेवींच्या अंत्ययात्रेत तो पुर्णवेळ श्रीदेवींच्या माथ्याशी उभा होता. श्रीदेवींच्या अर्थीला खांदा दिला.

 

असे होते त्यांचे संबंध
सूत्रांनुसार बोनी कपूर यांनी पहिली बायको मोना यांना सोडून श्रीदेवीसोबत दूसरे लग्न केले होते. यामुळे सर्वात जास्त अर्जुन भडकला होता. तो म्हणाला होता की जान्हवी आणि खुशी त्याच्या बहिणी नाही. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, जान्हवी आणि खुशीसोबत त्याचे काहीच नाते नाही. आम्ही जास्त भेटत नाही आणि वेळही घालवत नाही. हे नाते महत्त्वाचे नाही. येवढेच नाही तर त्याला श्रीदेवी आवडत नव्हती. तो म्हणाला होता की, श्रीदेवी फक्त माझ्या वडीलांची बायको आहे. अर्जुन हा बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. अर्जुनला अंशुला ही एक बहिण आहे. जून 1996 मध्ये बोनीने श्रीदेवीसोबत दूसरे लग्न केले होते. यानंतर अर्जुनच्या आईला खुप त्रास सहन करावा लागला होता. श्रीदेवीसोबत लग्न केल्यानंतर बोनी कपूर मोनापासून दूर झाले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अर्जुनचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...