आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजपाल यादवपासून राजूपर्यंत, लाइमलाइटपासून कायम दूर राहतात या 10 विनोदवीरांच्या पत्नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः टीव्ही इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत, असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांना त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जाते. आज त्यांनी इंडस्ट्रीत स्वतःची विनोदवीर म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहेत. राजू श्रीवास्तव, सुनील ग्रोवर, राजपाल यादव यांना सगळेच ओळखतात, पण त्यांच्या अर्धांगिनींना फारसे कुणी ओळखत नाहीत. या विनोदवीरांच्या पत्नी कायम प्रसिद्धीपासून दूर राहतात. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच 10 प्रसिद्ध विनोदवीरांच्या बेटर हाफची ओळख करुन देत आहोत. 

 

राजपाल यादव आणि राधा
राजपाल यादवने अनेक चित्रपटांमधून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना भरपूर हसवले. त्याच्या पत्नीचे नाव राधा यादव असून ती प्रसिद्धीपासून दूर राहते. बॉलिवूड इव्हेंट्सलासुद्धा ती फारशी हजेरी लावताना दिसत नाही. राजपालने 'मस्त' (1999), 'हम किसी ने कम नहीं' (2002), 'हंगामा' (2003), 'मुझसे शादी करोगी' (2004), 'वक्त' (2004), 'शादी नबंर वन' (2005), 'फिर हेरा फेरी' (2006), 'चुप चुपके' (2006), 'भूल भुलैया' (2007) सह अनके गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

 

राजू श्रीवास्तव आणि शिखा 
छोट्या पडद्यावर 'गजोधर' या नावाने प्रसिद्ध असलेला विनोदवीर राजू श्रीवास्तव विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव शिखा आहे. या दाम्पत्याला अंतरा ही एक मुलगी आणि आयुष्मान हा एक मुलगा आहे. राजूची पत्नी शिखा कायम लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. राजूला 'गजोधर भइया...' म्हणून ओळखले जाते. ही भूमिका नेमकी सुचली तरी कशी, याचा उलगडा राजूने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत केला होता. राजूने सांगितले होते, "आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत कानपूरपासून 50 किलो मीटर अंतरावर असलेल्या मामाच्या घरी जायचो. तेथे आमचे केस कापणा-या न्हावीचे नाव 'गजोधर भैया' होते. तो केस कापताना स्वतःविषयीचे किस्से सांगायता. तेव्हापासून ते नाव आणि त्याचे किस्से माझ्या डोक्यात होते. तेच पात्र मी साकारले आणि ते लोकांना पसंत पडले. राजूने टीव्ही मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'तेजाब' (1988), 'मैंने प्यार किया' (1989), 'बाजीगर' (1993), 'मैं प्रेम की दीवानी हूं' (2003), 'बॉम्बे टू गोवा' (2007) सह अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. तर छोट्या पडद्यावर त्याने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज', 'शक्तिमान', 'राजू हाजिर हो', 'कॉमेडी का महा मुकाबला', 'कॉमेडी सर्कस', 'देख भाई देख' सह अनेक शोज केले.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कायम पडद्यामागे राहणा-या विनोदवीरांच्या पत्नींविषयी...

बातम्या आणखी आहेत...