आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Film Role Rejected By Sridevi, श्रीदेवीने नाकारलेले चित्रपट, श्रीदेवीचे निधन

श्रीदेवीने नाकारलेल्या भूमिकांनी सुपरस्टार झाल्या रवीना-माधुरीसह या अभिनेत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले. दुबईत श्रीदेवीने अखेरचा श्वास घेतला. 54 वर्षीय श्रीदेवी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशीसोबत भाचा मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईत होती. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणा-या श्रीदेवीची अकाली एक्झिट संपूर्ण देशाला चटका लावून गेली आहे. 2017 मध्ये श्रीदेवीच्या फिल्मी करिअरला 50 वर्षे पूर्ण झाली होती.

 

13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूच्या शिवकाशी येथे जन्मलेल्या श्रीदेवीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या फिल्मी करिअरमध्ये श्रीदेवीने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? श्रीदेवीने नाकारलेले चित्रपट नंतर माधुरी आणि रवीनासह अनेक अभिनेत्रींनी स्वीकारले आणि त्या सुपरस्टार बनल्या. 

 

मोहरा (1994)
श्रीदेवीऐवजी कोण झळकले : रवीना टंडन

दिग्दर्शक राजीव राय यांच्या मोहरा या चित्रपटासाठी श्रीदेवीला पहिली पसंती होती. पण श्रीदेवीने हा चित्रपट नाकारला. त्यानंतर दिव्या भारतीला या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. पण चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळात दिव्या भारतीचा मृत्यू झाला. त्यानंतर रवीना टंडनला घेऊन हा चित्रपट पूर्ण करण्यात आला. चित्रपट हिट ठरला आणि रवीना टंडन सुपरस्टार झाली.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, श्रीदेवीने नाकारलेल्या आणखी 18 चित्रपटांविषयी...  

बातम्या आणखी आहेत...