आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या अंत्यविधीसमयी अशी होती जान्हवीची अवस्था, समोर आला हा फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोनी कपूर आणि जान्हवी कपूर - Divya Marathi
बोनी कपूर आणि जान्हवी कपूर

मुंबई - श्रीदेवींच्या मृत्यूनंतर त्यांची मोठी मुलगी जान्हवीचा एक फोटो समोर आलाय. हा फोटो श्रीदेवींच्या अंत्यविधीवेळी क्लिक करण्यात आलाय. हा फोटो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, जान्हवी किती कोसळली आहे. 


शेवटच्या काळात आईपासून दूर होती जान्हवी
- शनिवारी 24 फेब्रुवारीला श्रीदेवी यांचे निधन झाले. त्या फक्त 54 वर्षांच्या होत्या. यावेळी त्या दुबईमध्ये होत्या. भाचा मोहित मारवाहच्या लग्नासाठी त्या तिकडे गेल्या होत्या. 
- श्रीदेवी या पती बोनी कपूर आणि लहान मुलगी खुशी कपूरसोबत लग्नाला गेल्या होत्या. परंतू जान्हवी ही लग्नाला जाऊ शकली नव्हती. ती 'धडक' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती.

 

मुलीच्या पदार्पणासाठी उत्साहित होती श्रीदेवी
जान्हवी 'धडक'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. मुलीच्या पहिल्या फिल्मसाठी श्रीदेवीही उत्साहित होती, ती स्वतः जान्हवीला घेऊन उदयपूरमधील बर्डव्हिलेज मेनार येथे पोहोचली होती. प्रोड्यूसर करण जोहर टीमसह मेनार येथे पोहोचला होता. या फिल्ममध्ये शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर लीड रोलमध्ये आहे. गावातील ब्रहम सागर किनाऱ्यावर असलेल्या 52 फूट उंच शिव प्रतिमेच्या पूजेने शूटिंगला सुरुवात झाली होती. शूटिंगच्यावेळी श्रीदेवीही जान्हवीसोबतच होती. 'धडक'चे दिग्दर्शन शशांक खेतान करत आहे. ही फिल्म 6 जुलै 2018 ला रिलीज होणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...