आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Glamorous Actresses At 40: Sridevi Aishwarya Rai Bachchan To Malaika Arora

54 व्या वर्षीही श्रीदेवीच्या चेह-यावरचे तेज होते कायम, या 9 जणीवरही दिसत नाही वयाचा परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शनिवारी दुबईत बाथटबमध्ये बुडाल्याने अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच बॉलिवूडसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली. वयाच्या 54 व्या वर्षीही श्रीदेवी अतिशय सुंदर दिसत होत्या. मृत्यूपूर्वीच्या  शेवटच्या फोटोजमध्ये त्यांचे सौंदर्य आणि ग्लॅमरस स्पष्ट झळकतंय.  13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडू येथे जन्मलेल्या श्रीदेवी यांनी 1975 मध्ये आलेल्या 'जूली' या चित्रपटाद्वारे डेब्यू केले होते. या चित्रपटात त्या बालकलाकाराच्या रुपात झळकल्या होत्या. 1983 मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला' या चित्रपटातून त्या  रात्रीतून स्टार झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. श्रीदेवीच नव्हे तर बॉलिवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी वयाची चाळिशी ओलांडली असून त्यांच्या चेह-यावर वाढत्या वयाचा मुळीच परिणाम झालेला दिसत नाही. या पॅकेजमधून एक नजर टाकुयात, अशाच 10 अॅक्ट्रेसेसवर...

 

वयाच्या 44 व्या वर्षीही बोल्ड आणि ग्लॅमरस आहे ऐश्वर्या राय...  
1:- 1 नोव्हेंबर 1973 रोजी मंगळूरू येथे जन्मलेल्या ऐश्वर्या राय बच्चनने चित्रपटच नव्हे तर मॉडेलिंग दुनियेत यशोशिखर गाठले. 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी करणारी ऐश्वर्या आता 44 वर्षांची झाली आहे.  'और प्यार हो गया' (1997) या चित्रपटातून तिने डेब्यू केले होते. त्यानंतर ती 'ताल', 'हम दिल दे चुके सनम', 'धूम 2', 'देवदास', 'रोबोट' आणि 'गुरू'सह अनेक चित्रपटांमध्ये झळकली. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या इतर 9 अभिनेत्रींविषयी..  

बातम्या आणखी आहेत...