आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इरफान खानच्या आजाराविषयी पत्नीने सोडले मौन, म्हणाली असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : काही दिवसांपुर्वी इरफान खानने त्याच्या गंभीर आजाराविषयी ट्वीट केले होते. नुकतेच त्याची पत्नी सुतापाने त्याच्या आजारपणाविषयी पोस्ट केली आहे. यामध्ये ती म्हणाली की, ईरफान वॉरिअर आहे. यासोबतच त्याला खरच गंभीर आजार झाला असल्याचेही सांगितलेय.
सुतापा म्हणाली- इरफानच्या आजारावर नक्कीत मात करेल...


- सुतापाने लिहिले की, " माझा बेस्ट फ्रेंड आणि पार्टनर एक योध्दा आहे. तो जीवनाच्या अडचणींचा सामना खुप चांगल्या प्रकारे करतोय."   

- " मॅसेज आणि कॉलचे उत्तर देऊ शकत नसल्याने माफी मागते. परंतू सर्व लोक प्रार्थना आणि चिंता करत आहे त्यांची मी ऋणी आहे."
- "मी देवाची आणि माझ्या जोडीदाराचीही आभारी आहे. त्यांनी मला योध्दा बनवले. सध्या मी युध्दक्षेत्रात त्या लढाईची प्लानिंग करतेय. जे युध्द मला जिंकायचे आहे."
- "यावर विजय मिळवणे सोपे नाही, परंतु कुटूंब, मित्र आणि चाहत्यांच्या प्रार्थनांनी मला आशावादी बनवले, यासोबतच विजयासाठी आश्वस्तही केलेय."
- "मला असे वाटते की, इरफानला काय आजार झाला आहे, यावर तर्क लावण्यात आपण आपली बहूमुल्य ऊर्जा घालवू नये."
- "इरफान लवकर बरा व्हावा यासाठी तुम्ही प्रार्थना करा. माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या आयुष्यावर लक्ष द्यावे आणि या लढाईत विजय मिळवण्यासाठी तयार राहावे. माझे कुटूंब लवकरच या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी तुमच्यासोबत सहभागी होईल. तुम्हा सर्वांचे धन्यवाद (सुतापा, इरफान, बबील, अयान(बबील-इरफानचे मुलं)"

 

डॉक्टरांनी दिला आजारामाचा सल्ला
- काही दिवसांपुर्वी इरफानच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, त्याला काविळ झालाय. यानंतर त्याला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता.
- इरफान सध्या 'ब्लॅकमेल' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. यासोबतच तो लवकरच विशाल भारव्दाजचा दीपिका पदुकोण स्टारर चित्रपटाची शूटिंग करणार आहे.
- सध्या इरफानच्या आजारपणामुळे चित्रपटाचे शूटिंग पुढे ठकलण्यात आलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इरफान खानचे फॅमिली फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)