आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या मृत्यूनंतर सावत्र बहिणींमधला \'दुरावा\' संपला, इंस्टाग्रामवर केले अंशुलाला फॉलो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले. श्रीदेवींच्या अकाली जाण्याचा धक्का त्यांची मुलगी जान्हवी, खुशी आणि नवरा बोनी कपूर यांना पचवणे खुप अवघड आहे. या संकटकाळात जान्हवीची सावत्री बहिण अंशुला आणि भाऊ अर्जुन त्यांच्या जवळ आले आहेत. त्यांच्यातील दुरावा आता संपला आहे. 6 मार्चला जान्हवीचा वाढदिवस झाला. यावेळी अंशुलासोबत कपूर कुटूंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. नुकतेच अंशुलाने इंस्टाग्रामवर जान्हवी आणि खुशीवर वाईट कमेंट करणा-यांना सडेतोड उत्तर दिसेल. यानंतर जान्हवीने आपली बहिण अंशुलाला इंस्टाग्रामवर फॉलो करणे सुरु केलेय.

 

अंशुलाने लिहिली अशी सोशल पोस्ट
अंशुलाने आपल्या सोशल अकाउंटवर एक पोस्ट लिहिली. यामध्ये ती म्हणाली की प्रत्येक परिस्थितीचा खंबीरपणे सामना करावा. याच पोस्टवर अर्जुन कपूरच्या फॅनने जान्हवी आणि खुशी कपूरवर वाईट कमेंट्स केले. फॅन्स बोनी कपूरलाही वाईट बोलले. हे पाहून अंशुला भडकली आणि तिने वडील-बहिणीवर फॅन्सने केलेली कमेंट डिलीट केली.

 

असे दिले उत्तर
अंशुलाने उत्तरात लिहिले की, 'तुम्हाला विनंती आहे की, माझ्या बहिणींसाठी चुकीच्या भाषेचा वापर करु नका. मी हे सहन करु शकत नाही यामुळे मी ही कमेंट डिलीट केली. माझा भाऊ अर्जुन कपूरच्या तुमच्या प्रेमासाठी मी तुमची आभारी आहे. तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद'


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जान्हवीच्या बर्थडेपार्टीत उपस्थित होती अंशुला...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...