आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिवंशराय बच्चन यांच्या अटीमुळे घाईघाईत झाले होते जया-बिग बींचे लग्न, ही होती अट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा आज (9 एप्रिल) वाढदिवस असून त्यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत. जन्म मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे 9 एप्रिल 1948 रोजी त्यांचा जन्म झाला.  1973 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. अमिताभ आणि जया यांची प्रेमकहाणी अतिशय रंजक आहे. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या एका अटीमुळे दोघांना घाईघाईत लग्न करावे लागले होते. 44 वर्षांपूर्वी नेमके काय घडले होते, जाणून घेऊयात... 

 

रंजक आहे जया-अमिताभ यांची लव्ह स्टोरी..
बॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी जोड्यांपैकी एक असलेल्या अमिताभ आणि जया यांची लव्ह स्टोरी रंजक आहे. शिक्षण सुरू असतानाच जया यांचे अमिताभ यांच्यावर प्रेम जडले होते. अमिताभ यांच्या जीवनातील एक किस्सा कायम चर्चेत असतो. तो म्हणजे त्यांची आणि रेखाची लव्ह स्टोरी. या प्रकरणामुळे त्यांचे वैवाहिक जीवन धोक्यातही आले होते. पण त्या दोघांनी मिळून पुन्हा सर्वकाही सुरळीत केले. आज ते आदर्श म्हणून सर्वांसमोर आहेत.

 

पहिली भेट..
जया बच्चन पुण्यात शिकत होत्या त्यावेळी अमिताभ त्यांचा पहिला चित्रपट 'सात हिंदुस्तानी' (1969) च्या शुटिंगसाठी पुण्यात आले होते. जया बच्‍चन त्यांना ओळखत होत्या. जया यांच्या मैत्रिणी अमिताभ यांनी लंबू-लंबू म्हणून चिढवायच्या. पण जया यांच्या मनात त्यांची प्रतिमा हरिवंशराय यांचा संस्कारी आणि साधा मुला अशी होती. हृषिकेश मुखर्जींनी त्यांच्या 'गुड्डी' चित्रपटासाठी जया भादुरी यांच्यासह अमिताभ बच्चन यांना कास्ट केले होते. पण नंतर अमिताभ बच्चन यांना चित्रपटातून बाजुला करण्यात आले. चित्रपटसृष्टीशी संबंध असलेल्यांच्या मते याच प्रकरणानंतर जया यांच्या मनात अमिताभ यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभुती निर्माण झाली होती.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जया आणि बिग बी यांच्या लग्नाचे  17 दुर्मिळ फोटोज.. वाचा बिग बींच्या वडिलांनी काय घातली होती अट..

बातम्या आणखी आहेत...