आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षांची झाली श्रीदेवींची मुलगी, बघा जान्हवीचे बालपणीचे निवडक PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची थोरली मुलगी जान्हवी कपूर हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 21 वर्षे पूर्ण केली आहेत. जान्हवीचा जन्म 6 मार्च, 1997 रोडी मुंबईत झाला. जान्हवीचा हा पहिला असा वाढदिवस आहे, जेव्हा तिची आई तिच्यासोबत नाही. 24 फेब्रुवारी रोजी दुबईत श्रीदेवी यांचे निधन झाले होते. बालपणापासूनच आईसारखी अभिनेत्री होण्याचे स्वप्न जान्हवीने उराशी बाळगले होते. करण जोहरच्या होम प्रॉडक्शनच्या आगामी 'धडक' या चित्रपटातून जान्हवी आता बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'सैराट' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबत अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर झळकणार आहे. 


बालपणापासून आईला केले फॉलो... 
जान्हवीने बालपणापासूनच आई श्रीदेवीला फॉलो केले. जान्हवीने बॉलिवूडमध्ये करिअर करावे, अशी श्रीदेवी यांची इच्छा होती. पण दुर्दैवाने जान्हवीचा पहिला चित्रपट बघण्यासाठी श्रीदेवी आता या जगात नाहीत. जान्हवीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तिच्या बालपणीच्या निवडक छायाचित्रांचे कलेक्शन तुम्हाला दाखवत आहोत. 


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, जान्हवीच्या बालपणीचे निवडक फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...