आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता असा दिसतो काजोलचा पहिला हीरो, आई-बहिणीची हत्या करुन वडिलांनी केली होती आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नव्वद दशकात रिलीज झालेल्या 'बेखुदी' या चित्रपटातील काजोलसोबत काम केलेल्या कमल सदानाला आता सर्वचजण विसरले आहेत. कमलचे वैयक्तिक आयुष्य फार वेदनादायी राहिले आहे. 21 ऑक्टोबर 1990 रोजी कमलच्या 20 व्या वाढदिवशी त्याच्या वडिलांनीच त्याची आई आणि बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली होती. कमलने सांगितल्यानुसार, त्याच्या वडिलांनी त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तो कसाबसा वाचला. या घटनेनंतर कमलच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. 


कमलच्या आईवडिलांचे नेहमीच उडायचे खटके...
- कमलची आई सईदा आणि वडील बृज सदाना यांच्यात नेहमीच वाद होत असत. कमलच्या वाढदिवशीही असेच झाले.
- नवरा-बायकोमधील वाद अगदी विकोपाला गेला. नशेमध्ये असताना बृज सदाना यांनी बंदुक काढली आणि त्यातील गोळी पहिले पत्नीवर चालवली. शेजारच्या खोलीत असलेली कमलची बहीण गोळीचा आवाज ऐकून बाहेर आली तर वडिलांनी तिच्यावरही गोळी चालवली. यात दोघींचा जागीच मृत्यू झाला होता. 
- यानंतर बृज सदाना त्यांच्या बेडरुममध्ये गेले आणि स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. हे सर्व घडले तेव्हा कमल तेथेच होता. यानंतर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता आणि त्याचे अनेकवेळा काउंसलिंग करण्यात आले. 
- कमल आजही तो भयानक दिवस आठवत म्हणतो, की मला कळत नाही की माझ्या वडिलांनी असे का केले.


पुढील स्लाईड्वर वाचा, जेव्हा काजोलने कानाखाली मारुन मारुन लाल केला होता कमलचा चेहरा..

बातम्या आणखी आहेत...