आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना कपूरने केला खुलासा- यामुळे सैफला मुलाचे नाव तैमूर ठेवायचे नव्हते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान सर्वात प्रसिध्द स्टार किड्सपैकी एक आहे. मीडिया तैमूरला कव्हर करण्यासाठी नेहमीच तयार असते. नुकताच एका इव्हेंटमध्ये करीनाने तैमूरच्या नावाविषयी मोठा खुलासा केला. करीनाने सांगितले की, तैमुरचे नाव पहिले फैज ठेवले होते. हे नाव सैफने सुचवले होते. परंतू तिला मुलाचे नाव तैमूर ठेवायचे होते.
 
मुलाच्या नावार ट्रोल झाल्याविषयी असे बोलली करीना...
एका प्रश्नाचे उत्तर देताना करीनाने सांगितले की, तैमूरच्या नावाविषयी सोशल मीडियावर खुप ट्रोलिंग झाली. परंतू त्याच काळात अनेक लोक आमचे समर्थन करत होते. ते ट्रोल्स आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. करीनाने सांगितले की, ज्या दिवशी मी डिलिवरीसाठी हॉस्पिटलमध्ये जात तेव्हा मी सैफशी बोलले आणि त्याने फैज हे नाव सुचवले. सैफ म्हणाले की, हे नाव खुप काव्यात्मक आणि जास्त रोमानी आहे. परंतू मी म्हणाले की, त्याचे नाव तैमूर असेल, कारण याचा अर्थ लोह असा असतो. मी जर मुलाला जन्म दिला तर तो योध्दा असेल आणि असेच झाले.
 
- तैमूरला मिळत असलेल्या मीडिया अटेंशनविषयी करीना म्हणाली की, 'मी हे कसे थांबवू हे मला कळत नाहीये. मला वाटते की, तो आता कॅमेरासोबत जास्त फ्रेंडली झाला आहे. तो सरळ कॅमेराकडेच पाहतो.'
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा करीना, सैफ आणि तैमूरचे फोटोज...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...