आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या तैमूरला काय बनवू इच्छिते करीना, मुलाच्या करिअरच्या प्रश्नावर दिले हे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा लाडका लेक तैमूर बॉलिवूडच्या लोकप्रिया स्टारकिड्सपैकी एक आहे. तैमूरविषयी जाणून घेण्यास प्रत्येक जण उत्सुक असतो. अलीकडेच एका अवॉर्ड सोहळ्यात करीनाला तैमूरने कुठल्या प्रोफेशनमध्ये करिअर करावे, असा प्रश्न विचारला गेला. याचे उत्तर देताना ती म्हणाली, "मोठा झाल्यानंतर तैमूरला हवं ते प्रोफेशन निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. पण मला जर विचाराल तर त्याने क्रिकेटर व्हावं, अशी माझी इच्छा आहे." तैमूरचे आजोबा मन्सूर अली खान पतौडी हे क्रिकेटपटू होते.


- एका मुलाखतीत सैफने म्हटले होते, की तैमूरने सामान्य मुलांप्रमाणे आयुष्य जगावे, अशी माझी इच्छा आहे. एवढ्या कमी वयातच त्याला स्टारडम मिळालं आहे. आम्ही तैमूरला इंग्लंडच्या एखा चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
- अलीकडेच अभिनेता शाहरुख खानने त्याचा धाकटा मुलगा अबरामला हॉकी प्लेअर बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. शाहरुख म्हणाला होता, की अबरामला क्रिकेट नव्हे तर फुटबॉल खेळणे पसंत आहे. माझी इच्छा आहे, की त्याने भारतासाठी हॉकी खेळावे.


सवा वर्षांचा झाला आहे तैमूर...
- तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016 रोजी झाला. तो आता एक वर्ष चार महिन्यांचा आहे. तैमूर अधूनमधून करीनासोबत तिच्या शूटिंग सेटवर दिसत असतो.
- काही दिवसांपूर्वीच तैमूर करीनाचा कमबॅक चित्रपट असलेल्या 'वीरे दि वेडिंग'च्या सेटवर दिसला होता.


पुढील स्लाईड्सवर, 12 PHOTOS मध्ये बघा तैमूरचे वेगवेगळे अंदाज...   

बातम्या आणखी आहेत...