आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हेंटमध्ये विना ड्रायव्हरच्या कारने पोहोचला धर्मेंद्रचा पुतण्या, सर्वांना केले चकीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नुकतेच धर्मेंद्र यांचा पुतण्या आणि बॉलिवूड अभिनेता अभय देओलने सर्वांना चकीत केले. एका लॉन्चिंग इव्हेंटमध्ये त्याच्या एंट्रीने सर्व लोक चकीत झाले. तो ब-याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 'नानू की जानू' या आगामी चित्रपटातून तो दिसणार आहे. याच काळात तो मुंबईमध्ये त्याच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी ठेवलेल्या इव्हेंटमध्ये ड्रायव्हर लेस कारमध्ये पोहोचला. तो ज्या कारमधून आला होता त्यामध्ये ड्रायव्हर नव्हता. तरीही कार योग्य दिशेला चालत होती. अभयच्या या न्यू स्टाइल एंट्रीलापाहून सर्वच लोक हैरान झाले. 

 

असे विना ड्रायव्हरच्या कारने इव्हेंटमध्ये पोहोचला अभय
- अभयचा 'नानू की जानू' हा चित्रपट भूताचा आहे. अशावेळी ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये थोडे लाइमलाइटमध्ये येण्यासाठी त्याने खास ड्रायव्हरलेस कार बुक केली होती.
- या ऑडीला अभय रिमोटच्या माध्यमातून चालवत होता आणि ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसला होता. तो या अंदाजात रेड कारपेटवर दिसला.
- ऑडीची ड्रायव्हरलेस कार मार्केटमध्ये आली आहे. परंतू अजुनही सेलसाठी लॉन्च झालेली नाही. ही फक्त टेस्ट ड्राइव्हसाठी घेतली जाऊ शकते.

 

अशी आहे चित्रपटाची स्टारकास्ट
- चित्रपटात अभय देओलसोबत मनुऋषी चड्ढा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री पत्रलेखासुध्दा ट्रेलर लॉन्चिंगवर उपस्थित होती.
- फराज हैदर या चित्रपटाला डायरेक्ट करत आहे. यापुर्वी अभयने 'ओए लकी लकी ओए' मध्ये तिच्यासोबत काम केलेय.
- अंक्षयचा हा हॉरर कॉमेडी चित्रपट 'नानू की जानू' हा 20 एप्रिल 2018 ला रिलीज होईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अभय देओलच्या ट्रेल लॉन्च इव्हेंटचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)