आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7th Wedding Ann: 83 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे सनी, नवरासुद्धा आहे गर्भश्रीमंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनी (करनजीत कौर वोहरा) आणि तिचा नवरा डेनियल वेबर यांच्या लग्नाचा आज सातवा वाढदिवस आहे. 11 एप्रिल  2011 रोजी पंजाबी पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले होते. आज सनी आणि डेनियल यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात, किती कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत हे दोघे... 

 

- सनीचा जन्म 13 मे 1981 रोजी कॅनडातील सर्निया ओंटारिया येथे  झाला. नेटवर्दियर (Networthier.com) च्या माहितीनुसार, इंटरनेटवर सर्वाधिक शोधल्या जाणा-या सेलिब्रिटींपैकी एक सनी लिओनीची 2016 साली एकुण संपत्ती 13 मिलियन डॉलर (सुमारे 83.20 कोटी) इतकी आहे.

- रिपोर्ट्सनुसार, सनी एका सिनेमासाठी 4.5 कोटी रुपये मानधन घेते. सनीजवळ दीड कोटी किंमतीची एक मसेराटी आणि एक बीएमडब्ल्यू कार आहे. 2014 साली तिचा नवरा डॅनियल वेबरने तिला ही गाडी गिफ्ट दिली होती.


2009 नंतर वाढला सनीच्या संपत्तीचा आकडा...
- Networthier.comच्या माहितीनुसार, 2009 साली सनी आणि डेनियल यांनी सनलस्ट पिक्चर्स नावाने स्वतःचा स्टुडिओ सुरु केला. त्यानंतर त्यांच्या संपत्तीत वाढ झाली. डेनियल आणि सनी यांनी सुमारे 56 अॅडल्ट सिनेमांमध्ये काम केले. शिवाय स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून सनीने 59 सिनेमांचे दिग्दर्शनसुद्धा केले आहे.

 

हे आहे सनीच्या कमाईचे माध्यम...
- सनीने आता पोर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे. मात्र आजसुद्धा तिची सर्वाधिक कमाई ही अॅडल्ट वेबसाइट आणि हिंदी सिनेमांच्या माध्यमातून होते. 
- याशिवाय 'द गर्ल नेक्स्ट डोर', 'पायरेट्स ब्लड्स' आणि 'द वर्जिनिटी हिट' या हॉलिवूड सिनेमांमधूनही सनीने चांगली कमाई केली. 
- सनी भारतात मॉडेलिंग, अँडॉर्समेंट, रिअॅलिटी शोज, स्टेज शोज आणि बॉलिवूड सिनेमांमधून चांगली कमाई करत आहे.


एकेकाळी जर्मन बेकरी आणि टॅक्स फर्ममध्ये केलंय सनीने काम...
- पोर्न इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सनीने एका जर्मन बेकरी आणि टॅक्स फर्ममध्ये काम केलंय.
- सनीने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर 2003 मध्ये तिने विविड एन्टरटेन्मेंटसोबत तीन वर्षांचा करार केला, हार्डकोर पोर्नोग्राफीच्या जगात पाऊल ठेवले.
- सनीने 2011 मध्ये कलर्स वाहिनीच्या 'बिग बॉस' या वादग्रस्त शोच्या पाचव्या पर्वात वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. येथून तिला बॉलिवूडची दारं उघडी झाली.
- या शोच्या एका एपिसोडमध्ये महेश भट पाहुणे म्हणून आले होते. येथेच त्यांनी सनीला त्यांच्या सिनेमाची ऑफर दिली. मात्र सनीचा पदार्पणातला सिनेमा फ्लॉप ठरला. 
- 'जिस्म 2' या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. मात्र हळूहळू सनी येथे स्थिरावली. 'जिस्म 2' (2012), 'जॅकपॉट' (2013), 'रागिनी एमएमएस 2' (2014), 'एक पहेली लीला' (2015), 'कुछ-कुछ लोचा है' (2015), 'मस्तीजादे', 'टीना और लोलो' आणि 'वन नाइट स्टँड' हे सनीचे सिनेमे आहेत.


आईवडिलांचे झाले निधन...
- सनीचे आई-वडील हयात नाहीये. 2008मध्ये तिची आई आणि 2010मध्ये कॅन्सरमुळे तिच्या वडिलांचे निधन झाले. 
- सनीचा भाऊ सनदीप यूएसच्या एका प्रसिध्द हॉटेलमध्ये शेफ आहे.  

 

पुढे वाचा, कोण आहे सनीचा नवरा आणि त्याच्याविषयी बरंच काही...

बातम्या आणखी आहेत...