आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड गाण्यांवर पाकिस्तानी अभिनेत्रीने लावले ठुमके, दिसली होती खुलेआम सिगारेट ओढताना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा वादात आहे. नुकतेच तिचे काही डान्स परफॉर्मेंस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये ती बॉलिवूड गाण्यांवर डान्स करताना दिसतेय. ती आपली बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी नुकतीच कराचीला गेली होती. येथे तिने  'यूपी बिहार लूटने', 'जब वी मेट' के 'बटरफ्लाई', 'तनु वेड्स मनु' के 'बन्नों तेरा स्वैगर' आणि 'बरेली की बर्फी' या गाण्यांवर जोरदार परफॉर्मेंस दिला. 

 

दिसली होती सिगारेट ओढताना
- काही काळापुर्वी माहिरा खानचे काही फोटोज समोर आले होते. यामध्ये ती रणवीर कपूरसोबत पब्लिक प्लेसवर सिगारेट ओढताना दिसली होती.
- हे फोटोज व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या लिंकअपच्या चर्चा होत्या. परंतू या अफेअरमध्ये किती तथ्य आहे, याविषयी ते दोघंही काही बोलले नाहीत.
- माहिराने शाहरुख खानच्या 'रईस'(2017) चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. सध्या ती पाकिस्तानी फिल्म '7 दिन मोहब्बत इन' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.


पाकिस्तानच्या हायएस्ट पेड अभिनेत्रींमधून एक
- माहिराचा जन्म 21 डिसेंबर, 1984 मध्ये कराची येथे झाला. तिचे वडील हफीज खान यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला होता. ते फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये शिफ्ट झाले.
- माहिराचे शिक्षण कराचीच्या फाउंडेशन पब्लिक स्कूलमध्ये झाले. नंतर 17 व्यावर्षी हायर एज्यूकेशनसाठी ती कॅलिफोर्नियाला गेली.
- कॅलिफोर्नियाच्या यूनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश लिटरेचरसाठी तिने एनरोल केले. परंतू एका वर्षानंतरच अभिनेत्री झाल्यानंतर तिने शिक्षण सोडले.
- यूएसमध्ये शिक्षण घेत असताना तिने एका रेस्तरॉमध्ये वेट्रेस म्हणून पार्ट टाइम जॉब केला.
- येवढेच नाही तर यूएसमध्ये शिक्षण घेत असताना ती Rite Aid नावाच्या दूकानावर काम करायची. येथे ती टॉयलेट स्वच्छ करणे, झाडणे-पुसणे आणि कॅशिअरचे कामही करायची.
- खुप कमी लोकांना माहिती असेल की, माहिराची गणना सर्वात प्रसिध्द आणि हायएस्ट पेड पाकिस्तानी अॅक्ट्रेसेसमध्ये केली जाते.

 

एका बाळाची आई आहे माहिरा
- माहिराच्या पर्सनल लाइफविषयी बोलायचे झाले तर ती सिंगल पॅरेंट आहे.
- रिपोर्ट्सनुसार 2006 मध्ये लॉस एंजिलिसमध्ये माहिराची भेट अली अस्करी नावाच्या व्यक्तीसोबत झाली.
- दोघांमध्ये मैत्री झाली, या कपलने लग्न करण्याची प्लानिंग केली परंतू माहिराच्या कुटूंबातील लोक याविरुध्द होते.
- अशा वेळी तिने कुटूंबाविरुध्द जाऊन 13 जुलै 2007 मध्ये लग्न केले होते.
- जवळपास 8 वर्ष एकत्र राहिल्यानंतर 2015 मध्ये माहिराने घटस्फोट घेतला. या दोघांना एक मुलगा अजलान आहे. तो माहिरासोबत राहतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा माहिरा खानचे काही अनसीन फोटोज आणि वाचा काही महत्त्वाची माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)