आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक शूटनंतर एका महिन्यांचा ब्रेक घ्यायचा रणबीर, सोपे नव्हते संजय दत्त बनणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रणबीर कपूरच्या  'संजू: One Man Many Lives' चा टिझर प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. संजय दत्तच्या भूमिकेतील रणबीरने तर सर्वांना धक्काच दिला आहे. नुकत्याच एका इंटरव्ह्यूमध्ये रणबीरने तो संजय दत्त कसा बनला याबाबत सांगितले होते. 


शारीरिक आणि मानसिक तयारीही
- संजयच्या बायोपिकसाठी रणबीरने शारीरिक आणि मानसिक तयारीही केली. टिझरच्या प्रत्येक सीनमध्येच तो अगदी हुबेहूब संजय दत्त दिसत आहे. 
- रणबीरने सांगितले की, प्रत्येक शूटसाठी त्याने एका महिन्याचा गॅप घेतला. तो म्हणाला सर्वकाही अगदी लवकर घडत होते. आमच्याकडे फार वेळ नव्हता. मी प्रत्येक फेजपूर्वी स्वतःला एका महिन्याचा वेळ दिला. 
- संपूर्ण टीमनेच चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली. एका वर्षापूर्वीचे सांगायचे झाल्यास आम्ही जोरदार तयारीसह अनेक स्क्रीनटेस्ट केले. कारण मी संजय दत्त प्रमाणे मस्क्युलर दिसू शकतो हे राजू सरांना पटायला हवे होते. 
- माझी शरीरयष्टी बारीक आहे. त्यामुळे मसल्स तयार करणे अत्यंत कठीण होते. संजय दत्त तुरुंगातून बाहेर येणारा लूक, मुन्नाभाई आणि तरुणवयातील रॉकीसारखा लूक हे मोठे चॅलेंज होते. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, टिझरमधील रणबीरचे काही हुबेहूब लूक्स..

बातम्या आणखी आहेत...