आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज कपूरने सुरु केला होता होळी पार्टीचा ट्रेंड, आता का होत नाही सेलिब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : चित्रपट सृष्टीच्या होळीविषयी बोलायचे झाले तर सर्वात पहिले नाव हे राज कपूर यांचे येते. राज कपूर यांच्या निधनानंतर आरके स्टूडिओच्या त्या होळीचा उत्सव आता बंद झालाय. जवळपास 30 वर्षांपासून या स्टूडिओमध्ये होळीचा उत्सव साजरा झालेला नाही. तरीही आरके स्टूडिओच्या होळीचे इम्प्रेशन आणि इम्पॅक्ट अजूनही आहे. राज कपूरने 60 व्या दशाकामध्ये आपल्या भव्य स्टूडिओमध्ये होळी आणि गणेशोत्सवास सुरुवात केली. 


अशी खेळली जाते होळी
- आरके स्टूडियामध्ये पाण्याने भरलेल्या हौदांमध्ये गुलाल आणि रंग मिसळले जात होते.
- यानंतर सर्व त्यामध्ये बुडायचे. येणा-या प्रत्येकाचे स्वागत या टँकमध्ये डुबकी लावून केले जायचे.
- जो नकार द्यायचा त्याला मुद्दामुन टँकमध्ये फेकून दिले जायचे. यानंतर डान्सचा कार्यक्रम सुरु केला जायचा. यामध्ये सर्व लोक बेधुंद नाचत असायचे.
- आरके स्टूडिओच्या होळीमध्ये पुर्ण कपूर खानदानसोबत फिल्म इंडस्ट्रीचे लहान मोठे स्टार्स सहभाग व्हायचे.

 

होळीमध्ये सहभागी व्हायच्या राज कपूरच्या अॅक्ट्रेसेस...
राज कपूर गॉसिप आणि ग्लॅमर वर्ल्डचे राजा होते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची हिरोइन होळीचा आनंद उचलण्यासाठी येथे पोहोचत होते. आरके स्टूडिओच्या एतिहासिक होळीमध्ये नरगिस, वैजयंती माला, हेमामालिनी, धर्मेंद्र, मनोज कुमार, राजेंद्र कुमार, जितेंद्र, दारा सिंह, राकेश रोशन, प्राण, प्रेमनाथ, मिथुन, राजे खन्ना, अमिताभ, अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, राशी, रेखा, श्रीदेवी, जीनत अमानसारक्या कलाकार सहभागी झाले आहेत.


राज कपूरनंतर बंद झाली होळी
- नरगिस-वैजयंती मालापासून अमिताभ, अनिल कपूर आणि श्रीदेवीनेही आरके स्टूडिओच्या होळीचा आनंद लुटलाय.
- 1988 मध्ये राज कपूर यांच्या निधनानंतर आरके स्टूडिओची होळी बंद झाली. राज कपूरचे भआऊ किंवा मुलांनी हे पुढे सुरु ठेवण्यास खास उत्साह दाखवला नाही. या होळीच्या फक्त आठवणी राहिल्या.


- यश चोप्रा, सुभाष घई, अमिताभ बच्चन, सुधाकर बोकाडे अशा काही चित्रपट सृष्टीतील लोकांनी होळीचा कार्यक्रम ठेवला होता. परंतू त्यामध्ये राज कपूरसारखी मजा नव्हती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आरके स्टूडिओमध्ये होळी सेलिब्रेशनचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...