आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय वाटले, मी कायमचा आत जाईल.., काळवीट प्रकरणी प्रथमच बोलला सलमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलमानचा मोस्टअवेटेड चित्रपट 'रेस 3'चा ट्रेलर 15 मे रोजी सायंकाळी रिलीज झाला. सुमारे 150 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटात सलमान लीड रोलमध्ये आहे. ट्रेलर रिलीज इव्हेंटदरम्यान मीडियाशी बोलताना जेव्हा सलमानला विचारण्यात आले की, तो तुरुंगात गेला तेव्हा त्याच्यावर कोट्यवधी गुंतवलेले लोक परेशान होते. यावर बोलताना सलमान म्हणाला, तुम्हाला काय वाटले मी कायमचा आत राहणार आहे. पत्रकार नाही म्हणाला तर सलमानने त्याचे आभार मानले. 

 

सलमानला 20 वर्षे जुन्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सलमानला तुरुंगात जावे लागले. पण नंतर दोन दिवसांतच त्याला जामीन मिळाला होता. या प्रकरणात चार इतर आरोपी सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलमची कोर्टाने मुक्तता केली होती. 


'रेस 3' मध्ये पुन्हा दिसली सलमानची अॅक्शन 
सुमारे साडे 3 मिनिटांच्या ट्रेलरच्या सुरुवातीला सलमान (सिकंदर) चा डायलॉग 'ये रेस जिंदगी की रेस है...किसी की जिंदगी लेकर ही खत्म होगी' आहे. त्यानंतर संपूर्ण ट्रेलरमध्ये जोरदार अॅक्शन सिक्वेन्सेस आहेत. 


पुढे पाहा, रेस 3 च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...