Home | Gossip | Sanju One Man Many Lives Director Rajkumar Hirani Facts

या डायरेक्टरने दिला नाही एकही फ्लॉप चित्रपट, एकेकाळी पैशासाठी केले होते असे काम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 25, 2018, 06:35 PM IST

राजकुमार हिराणी यांचे दिग्दर्शन असलेला 'संजू: One Man Many Lives' चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे.

 • Sanju One Man Many Lives Director Rajkumar Hirani Facts

  मुंबई - फिल्म मेकर राजकुमार हिराणी यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या 'संजू: One Man Many Lives' चित्रपटाचा पहिला टिझर रिलीज झाला आहे. चित्रपटात संजय दत्तच्या भूमिकेत असलेला रणबीर चाहत्यांना प्रचंड भावला आहे. त्याने हुबेहूब संजूबाबा साकारण्याबरोबरच आवाज आणि डायलॉग्जनेही सर्वांना आश्चर्यचिकत केले आहे. टिझर पाहिल्यानंतर चित्रपट हिटच होणार अशा चर्चा आहेत. त्यामुळे हिटची गॅरंटी म्हणून ओळख असलेल्या राजकुमार हिराणी यांचा हा पाचवा हिट चित्रपट ठरेल. त्यांनी आतापर्यंत एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नाही.


  हिराणीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये 4 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ते मोठे हिट ठरले आहेत. 'संजू: One Man Many Lives' हा त्यांचा पाचवा चित्रपट आहे. या पॅकेजमध्ये आपण राजकुमार हिराणी यांच्या जीवनातील 5 रंजक फॅक्ट्स जाणून घेणार आहोत.


  1... 20 नोव्हेंबर 1962 ला नागपूरमध्ये जन्मलेल्या राजकुमार यांना लोक 'राजू' म्हणतात. फार कमी लोकांना माहिती आहे की, सुरुवातीच्या काळात पैशासाठी राजू यांनी जाहिरातींचे काम केले. त्यांनी विविध प्रकारच्या अनेक जाहिराती केल्या. नेहमी कॅमेऱ्यामागे राहणाऱ्या राजू यांनी 'फेविकॉल'च्या एका जाहिरातीमध्ये कामही केले होते.


  पुढील स्लाइड्सवर वाचा, डायरेक्टर राजकुमार हिराणी यांच्याशी संबंधित आणखी 4 फॅक्ट्स...


 • Sanju One Man Many Lives Director Rajkumar Hirani Facts

  2... राजकुमार यांचे वडील सुरेश हिराणी नागपूरमध्ये एक टायपिंग इन्स्टीट्यूट चालवत होते. राजू यांनी सीए व्हावे अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती. पण राजू यांचा ओढा थिएटरकडे होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी फोटोशूट करत त्यांना मुंबईत अॅक्टींग स्कूलमध्ये पाठवले. पण त्यांचे मन रमले नाही आणि ते 3 दिवसांत नागपूरला परतले. 

   

 • Sanju One Man Many Lives Director Rajkumar Hirani Facts

  3... पुण्याच्या 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)' मध्ये अॅक्टींगचा कोर्स तर बंद झाला होता. त्यामुळे त्यांनी एडिटिंगच्या कोर्ससाठी अर्ज केला आणि कोर्सही पूर्ण केला. एडिटिंगच्या कोर्सनंतर मुंबईत काम मिळणे कठीण होते. त्यामुळे ते जाहिरातींकडे वळाले. त्याच काळात त्यांना फेविकॉलच्या जाहिरातीत कामही केले. 

   

 • Sanju One Man Many Lives Director Rajkumar Hirani Facts

  4... राजकुमार हिराणी यांनी विधू विनोद चोप्रा यांच्या '1942 A Love Story' च्या प्रोमो आणि ट्रेलरचे काम केले. 'करीब' चा प्रोमोही एडिट केला. पण 2000 मधील 'मिशन कश्मीर'चे एडिटिंग हे त्यांचे सर्वात मोठे यश होते. 

   

 • Sanju One Man Many Lives Director Rajkumar Hirani Facts

  5... डायरेक्टर म्हणून राजकुमार यांनी पहिला चित्रपट केला 'मुन्नाभाई एमबीबीएस'. त्याला 'कल्ट क्लासिक' म्हटले जाते. नंतर त्यांनी 'लगे रहो मुन्नाभाई' आणि '3 इडियट्स' सारखे चित्रपट केले. फार कमी लोकांना माहिती आहे की, 5 वर्षे मेहनत करत त्यांनी 'पीके' चित्रपट लिहिला आणि एलियनच्या दृष्टीकोनातून लोकांची विचारसरणी दाखवला. त्याने 2014 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 

Trending