आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahrukh Khan Bungalow Mannat Was Villa Vienna Srk\'s मन्नत...एकेकाळी होते \'विला विएना\' नाव, 13.32 कोटींचा बंगला आज आहे 200 कोटींचा

Srk\'s मन्नत...एकेकाळी होते \'विला विएना\' नाव, 13.32 कोटींचा बंगला आज आहे 200 कोटींचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवुडचा सुपर स्टार शाहरुख खानला फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करुन 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरुखने स्वबळावर इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. आज तो जेवढा प्रसिद्ध आहे, तेवढाच प्रसिद्ध त्याचा मन्नत हा आलिशान बंगला आहे. आता तर मुंबईत बॉलिवूडचे तीन सुपरस्टार्स अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरुख खान यांचे निवासस्थान मुंबईत टुस्टिट प्लेस बनले आहेत. शाहरुखच्या मन्नत बंगल्याची सजावट एखाद्या महालापेक्षा कमी नाही. 


एकेकाळी ‘विला विएना’ नावाने प्रसिद्ध होता हा बंगला...
हा बंगला एकेकाळी ‘विला विएना’ या नावाने प्रसिद्ध होता. या बंगल्याचे मालक गुजरातचे किकू गांधी होते. आर्ट जगतातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असलेले किकू गांधी हे मुंबईतील प्रसिद्ध ‘शिमॉल्ड आर्ट गॅलरी’चे संस्थापक आहेत. मन्नतच्या शेजारी आणखी एक बंगला असून त्याला ‘किकि मंजिल’ म्हणून ओळखले जाते. येथे किकू गांधी यांचे आईवडील वास्तव्याला होते. हे दोन्ही बंगले किकू गांधी यांच्या वडिलांचेच होते. शाहरुख जेथे राहतो, त्याच बंगल्यात किकू गांधी यांचा जन्म झाला होता. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, मन्नतचे मुळ मालक असलेल्या किकू गांधी यांच्याविषयी..  

बातम्या आणखी आहेत...