आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसली सोनाक्षी सिन्हा, सोशल मीडिया यूजर्स म्हणाले - कुठे गेले संस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या एका बोल्ड फोटोमुळे सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. बोल्ड फोटोमुळे तिला ट्रोल केले जात आहे. सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रेड कलरच्या ट्रान्सपरंट गाऊनमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय.


ट्रोलर्स म्हणाले, कुठे गेले संस्कार... 
- विशेष म्हणजे सोनाक्षीचा हा फोटो लेटेस्ट नसून गेल्यावर्षीच्या जुलै महिन्यातील आहे. या फोटोत ती अतिशय ग्लॅमरस दिसतेय. पण सोशल मीडिया युजर्स तिला गाऊन पारदर्शन असल्याने ट्रोल करत आहेत.
- काही यूजर्सच्या मते, तिचा हा फोटो अतिशय चीप आहे, तर काहींनी तिला तुझे संस्कार कुठे गेलेत? असा टोला लगावला आहे.
- एका यूजरच्या मते, सोनाक्षी या ड्रेसमध्ये अतिशय वाईट दिसतेय. तर एका यूजरने तिला कपडेच का घालतेस, असा प्रश्न केला आहे.
- अशा एक ना अनेक कमेंट्स सोनाक्षीला मिळत आहेत. 


'रेस-3'मध्ये झळकणार सोनाक्षी...
- सोनाक्षी लवकरच 'रेस 3' या चित्रपटात झळकणार असून यात तिचा कॅमिओ आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटात सोनाक्षी अभिनेता साकिब सलीमच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे.
- 'रेस-3' यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. सोनाक्षीसह सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, बॉबी देओल, अनिल कपूर, डेजी शाह यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.


पुढील स्लाईड्सवर वाचा, यूजर्सचे कमेंट आणि बघा सोनाक्षी सिन्हाचे ग्लॅमरस फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...