आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वित्झर्लंडमध्ये नव्हे येथे सप्तपदी घेणार सोनम कपूर! समोर आली लग्नाची नवीन तारीख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडमध्ये सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतर  अभिनेत्री श्रिया सरन अलीकडेच रशियन टेनिस प्लेअर आंद्रेई कोशेचेवसोबत विवाहबद्ध झाली. आता अभिनेत्री सोनम कपूर हिलादेखील लग्नाचे वेध लागले असून तिच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सोनम मे महिन्यात नव्हे तर एप्रिल महिन्यातच विवाहबद्ध होणार आहे. येत्या 29 एप्रिल रोजी सोनम तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत सप्तपदी घेणार आहे. विशेष म्हणजे हे लग्न स्वित्झर्लंड किंवा लंडनमध्ये नव्हे तर मुंबईत होणार आहे. 

 

11 किंवा 12 मे रोजी होणार होते लग्न...
- पहिले बातमी आली होती, सोनम 11 किंवा 12 मे रोजी लग्न करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, स्वित्झर्लंड किंवा जिनीव्हा  येथे त्यांचे लग्न होणार होते. सोनमची धाकटी बहीण रिया कपूर ही जिनीव्हा येथील काही व्हेन्यूदेखील बघून आली होती. पण आता एप्रिल महिन्यात लग्न होणार असल्याचे समजते. 

 

फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे आनंद...
सोनम कपूर दिल्ली बेस्ड बिझनेसमन आनंद आहूजासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघे सिक्रेटली डेटिंग करत आहे. दोघे कधी इव्हेंट्समध्ये तर कधी लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसले. Bhane या फॅशन ब्रॅण्डचा आनंद मालक आहे. आनंदने व्हार्टन बिजनेस स्कूल (यूएस) मधून शिक्षण पूर्ण केले आहे. Bhane हा सोनमचा आवडता फॅशन ब्रॅण्ड असून अनेक ठिकाणी ती या ब्रॅण्डचे डिझाइन्स कॅरी करताना दिसत असते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, सोनम कपूर आणि आनंद आहूजाचे निवडक फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...