आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 व्या वर्षी डेब्यू, 21व्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न, वादग्रस्त राहिले या अॅक्ट्रेसचे आयुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलुगु चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आरती अग्रवाल हिची सोमवारी 34 वी बर्थ अॅनिव्हर्सरी होती. 5 मार्च, 1984 रोजी न्यूजर्सी येथे तिचा जन्म झाला होता. आरती आता या जगात नाही. वयाच्या 31 व्या वर्षी तिने या जगाचा कायमचा निरोप घेतला. तिचे आयुष्याला वादाची किनार आहे. कमी वयात सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या आरतीने वयाच्या 21 व्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. इतकेच नाही तर वयाच्या 23 व्या वर्षी तिने लग्न केले आणि दोन वर्षांतच तिचा घटस्फोट झाला होता. 


सुनील शेट्टीच्या सांगण्यावरुन केले होते सिनेसृष्टीत पदार्पण... 
आरती 14 वर्षांची असताना अभिनेता सुनील शेट्टीने  फिलाडेल्फिया, पेन्सिलवेनिया सिटीत झालेल्या एका कार्यक्रमात तिला स्टेजवर डान्स करताना पाहिले होते. तिचे सादरीकरण बघितल्यानंतर सुनील शेट्टीने आरतीच्या वडिलांना म्हटले होते, की आरतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करावे. वयाच्या 16 व्या वर्षी आरतीला सिनेसृष्टीत पदार्पणाची संधी मिळाली. 2001 मध्ये ती 'पागलपन' या बॉलिवूड चित्रपटात आणि याचवर्षी  'नुव्वु नाकु नचव' या साऊथ चित्रपटात झळकली होती. तिने अनेक गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ताम केले होते. साऊथच्या जवळजवळ सर्वच मोठ्या स्टार्ससोबत आरतीने स्क्रिन शेअर केली होती. चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबू, रवी तेजा, जूनियर एनटीआर, प्रभाससह अनेक मोठ्या स्टार्ससोबत तिने चित्रपटांत काम केले. छोट्याशा करिअरमध्ये आरतीने 25 चित्रपटांत अभिनय केला होता.


केली होती लिपोसक्शन सर्जरी

आरतीने लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिपोसक्शन सर्जरी केली होती. निधनाच्या महिन्याभरापूर्वी तिची ही सर्जरी झाली होती. या सर्जरीच्या माध्यमातून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी केली जाते. खरं तर हैदराबादच्या एका डॉक्टरांनी आरतीला ही सर्जरी न करण्याचा सल्ला दिला होती. पण तिने डॉक्टरांचे म्हणणे ऐकले नाही. या सर्जरीनंतर आरतीला श्वासोच्छवासाला त्रास जाणवू लागला होता. उपचारांसाठी तिला न्यूजर्सीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्यावर आणखी एक सर्जरी करण्यात येणार होती. पण तिथेच तिचा आकस्मिक मृत्यू झाला होता. आरतीच्या निधनानंतर तिच्या मॅनेजरने एका न्यूज एजन्सीला सांगितले होते, की ती लठ्ठपणा आणि फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होती. त्यावरच ती उपचार घेतल होती. पण याचदरम्यान तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी आरती फक्त 31 वर्षांची होती. निधनाच्या एका दिवसापूर्वी म्हणजे 5 जून, 2015 रोजी तिचा 'रानम- 2'  हा चित्रपट रिलीज झाला होता.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आरतीच्या आयुष्याविषयी आणखी बरंच काही... 

बातम्या आणखी आहेत...