आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅनिटी व्हॅन असलेली पहिली अभिनेत्री होती श्रीदेवी, अशी आहे स्टार्सची व्हॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आता आपल्यात नाही. वयाच्या 54 व्या वर्षी हार्ट अटॅकने श्रीदेवीचे निधन झाले. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका वठवणारी श्रीदेवी व्हॅनिटी व्हॅन ठेवणारी पहिली  बॉलिवूड अभिनेत्री होती. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवीने व्हॅनिटी व्हॅन बघितली होती. त्याकाळात एकच व्हॅनिटी मुंबईत प्रत्येक ठिकाणी शूटिंगसाठी जात होती. त्याकाळात श्रीदेवीने पर्सनल व्हॅनिटी व्हॅन तयार करुनघेतली होती. 


व्हॅनिटी व्हॅन नसल्याने यायच्या अडचणी.. 
व्हॅनिटी व्हॅनविषयी श्रीदेवीने एका मुलाखतीत म्हटले होते, की "जेव्हा आम्ही गावात शूट करायचो, तेव्हा तिथे कॉश्च्युम बदलण्यासाठी  क्रूच्या सर्व मुली, सीनिअर अॅक्ट्रेस आणि इतर सर्व महिला रिंगण करायच्या आणि त्यानंतर आम्ही कपडे बदलायचो.  वारंवार कॉश्च्युम बदलण्यासाठी आम्हाला अडचणी यायच्या आणि वेळसुद्धा खूप लागायचा. जर कधी शक्य झाले, तर गावांतील लोकांना विनंती करुन मग त्यांच्या घरी आम्ही तयार व्हायचो.  याच कारणामुळे मी स्वतःची व्हॅनिटी व्हॅन बनवून घेतली होती."


आजच्या काळात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींकडे व्हॅनिटी व्हॅन आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सेलेब्सच्या व्हॅनिटी व्हॅनविषयी सांगत आहोत. 


करीना कपूर
करीना कपूरची व्हॅनिटी व्हॅन बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींच्या व्हॅनिटीपेक्षा अतिशय महागडी आणि स्टायलिश आहे. यासोबतच सर्व सुविधा त्यात आहेत. 


पुढील स्लाईड्सवर बघा, बॉलिवूड स्टार्सच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...