आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sridevi Demise Ministry Of External Affairs Clean Chit Nothing Suspicious In Death

श्रीदेवीच्या मृत्यूवर आले विदेश मंत्रायलाचे स्टेटमेंट, जाणून घ्या काय म्हणाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींचा 24 फेब्रुवारीला दुबईमध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या कारणांवर संशय होता. परंतू दुबईच्या फोरेंसिक टीमने स्पष्ट सांगितले होते की, त्यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाला. आता भारताच्या विदेश मंत्रालयानेही सांगितले आहे की, त्यांच्या मृत्यूवर काहीच संशय नाही. 


काहीच संशयास्पद नाही
- विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमारने सांगितले की, यूएई सरकारचे कागदपत्र आम्हाला मिळाले आहेत. काही संशयास्पद असते तर आतापर्यंत समोर आले असते. एएनआयने ट्वीटरवर माहिती दिली. ट्वीट करुन त्यांनी लिहिले की, 'As far as I know, the paperwork from UAE govt were handed over to us and on the basis of that the mortal remains were brought to India. Had there been something suspicious, it would have come out by now: Raveesh Kumar, MEA Spokesperson on #Sridevi'.

3 दिवस कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर श्रीदेवींचे पार्थिवक भारतात आणण्यात आले होते. 27 फेब्रुवारीच्या रात्री श्रीदेवींचे पार्थिव मुंबईत पोहोचले होते. त्यांच्या अंत्यसंस्कार 28 जानेवारीला केले. श्रीदेवींच्या मृत्यूवर दिर्घ कायदेशीर प्रक्रिया पार पडली. अनेक लोक त्यांच्या मृत्यूवर संशय घेत होते. यानंतर अनेक सेलेब्सने ट्वीटवर  #LetHerRestInPeace यूज करुन श्रीदेवीच्या मृत्यूच्या कारणांवर अंदाज न लावण्यास सांगितले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवीचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...