आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूपुर्वी दुबईमध्ये श्रीदेवीला भेटली होती लहान बहिण, आतापर्यंत आली नाही समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 24 फेब्रुवारीला श्रीदेवी यांचे निधन झाले. रविवार चेन्नईमध्ये त्यांची प्रार्थना ठेवली जाणार आहे. यासाठी त्यांच्या दोन्ही मुली खुशी आणि जान्हवी चेन्नईला रवाना झाल्या आहेत. प्रार्थना सभा क्राउन प्लाजामध्ये होणार आहे. येथे तामिळ फिल्म इंडस्ट्रीचे अनेक सेलिब्रिटीज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याच काळात श्रीदेवी यांच्या मृत्यूसंबंधीत एक धक्कादायक गोष्ट समोर येतेय. त्यांची लहान बहिण श्रीलताला त्यांच्या मृत्यूविषयी मौन बाळगण्यास सांगितले आहे. त्यांना मृत्यूविषयी बोलण्यास अडवण्यात आले यासोबतच कॅमेरा समोर येण्यासही अडवण्यात आले आहे. 

 

मृत्यूच्या 2 दिवसांपुर्वी श्रीदेवीला भेटल्या होत्या श्रीलता 
- श्रीलता श्रीदेवीच्या मृत्यूपुर्वी त्यांच्यासोबत वेळ घालवणा-या मोजक्या लोकांपैकी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता मोहित मारवाहच्या लग्नानंतर कपूर कुटूंब यूएईमधून परतले. तेव्हाच मृत्यूच्या बरोबर 2 दिवसांपुर्वी श्रीदेवी आपल्या बहिणीला भेटल्या होत्या. 
- 'डेकन क्रॉनिकल' मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार श्रीलताला आपल्या बहिणीच्या मृत्यूवर मौन बाळगण्यास सांगितले आहे. कपूर कुटूंबाशी संबध असलेल्या जवळच्या सूत्राने सांगितलेल्या माहितीनुसार श्रीलताला याविषयी न बोलण्यास सांगितले आहे.
- असे का करण्यात आलेय याविषयी माहिती समोर आलेली नाही.


श्रीलताला मिळणार आहे श्रीदेवीचा चेन्नईचा बंगला
- सूत्रांनुसार श्रीलता आणि त्यांच्या पति सतीशला चेन्नई येथील श्रीदेवीचा बंगला मिळणार आहे.
- श्रीदेवी आणि त्यांची बहिण श्रीलता यांचे नाते खुप चांगले होते. परंतू 1990 मध्ये प्रॉपर्टीच्या वादावरुन दोघींमध्ये दुरावा आला.
- हा दुरावा जास्त काळ टिकला नाही. 2013 मध्ये श्रीदेवीला पद्मश्री मिळाल्यानंतर दोघींचे नाते चांगले झाले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवी आणि त्यांची बहिण श्रीलताचे काही निवडक फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...