आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या अस्थी विसर्जनावेळी भावूक झाले बोनी, थांबवू शकले नाही अश्रू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 24 फेब्रुवारीला बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. नुकतेच पती बोनी कपूर हरिव्दारवरुन अस्थी विसर्जित करायला गेले होते. त्या वेळचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये ते खुप इमोशनल दिसत आहेत. खरेतर अस्थी विसर्जनापुर्वी बोनी यांनी ब्राम्हणासोबत बसून पूजा केली आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी अनिल कपूर आणि मनीष मल्होत्रा त्यांच्यासोबत गेले होते. त्यांनी बोनी यांना सावरले. शुक्रवारी ते मुंबईला परतले. चेन्नईमध्ये होईल प्रेयर मीट...


- मृत्यूच्या 17 व्या दिवशी म्हणजेच रविवारी श्रीदेवीच्या आत्म्याच्या शांततेसाठी प्रेयर मीट ठेवण्यात येईल. रविवारी होणा-या या प्रेयरमीटमध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज सहभागी होण्याची शक्यता आहे.
- श्रीदेवी यांची प्रेयर मीट रविवार चेन्नईमध्ये होईल. संध्याकाळी 6 ते 7:30 पर्यंत हे सर्व होईल. येथे त्यांना श्रध्दांजली दिली जाईल.
- दुबईमध्ये श्रीदेवींचा अचानम मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शव पोस्ट मॉर्टमनंतर भारतात आणण्यात आले होते. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर बोनी कपूरने रामेश्वरममध्ये शांती पाठ केला. 

 

शूटिंगवर परतली श्रीदेवीची मुलगी
- श्रीदेवीच्या निधनानंतर त्यांची मुलगी जान्हवीने 21 वा वाढदिवस (8 मार्च) साजरा केला.
- जान्हवीच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली नव्हती. परंतू यावेळी त्यांचे फॅमिली मेंबर्स एकत्र आले आणि तिला आईची कमतरता भासू दिली नाही.
- जान्हवी आता बॉलिवूडच्या 'धडक' चित्रपटाच्या शूटिंगसाठी परतली आहे. सध्या ती मुंबईमध्ये शूटिंग करतेय. नंतर ती कोलकत्याला जाणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवीच्या अस्थि विसर्जनाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...