आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयाप्रदा म्हणाल्या, इतरांशी नाही तर स्वतःशीच होती श्रीदेवीची स्पर्धा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयाप्रदा आणि श्रीदेवी - Divya Marathi
जयाप्रदा आणि श्रीदेवी

हैदराबाद : गेल्या काही दिवसांपुर्वी श्रीदेवीला श्रध्दांजली देण्याच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वत साउथ चित्रपटांचे स्टार्स उपस्थित राहिले. या निमित्ताने श्रीदेवींची आठवण काढत जयाप्रदा म्हणाल्या की, श्रीदेवींची स्पर्धा स्वतःशीच होती. श्रीदेवी एक लक्ष्य बनवून पुढे जायच्या. आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेय. आमच्यामध्येही स्पर्धा होती. परंतू ही हेल्दी स्पर्धा होती. जयाप्रदा म्हणाल्या की, श्रीदेवीला आपल्या मुलीला आपल्याप्रमाणेच अभिनेत्री बनवायचे होते. श्रध्दांजली सभेचे आयोजन चित्रपट निर्माता आणि खासदार टी. सुब्बारामी रेड्डी यांनी केले होते. 15 तेलुगु चित्रपटात केले काम...


जयाप्रदा यांनी सांगितले की, " मी आणि श्रीदेवीने 15 तेलुगु चित्रपटात एकत्र काम केलेय. यासोबतच अनेक बॉलिवूड चित्रपटातही काम केलेय. आम्ही जेव्हा एकत्र स्क्रीन शेअर करायचो तेव्हा आमच्या स्पर्धा असायची. मग ती डायलॉग्सची असो किंवा अभिव्यक्तीची. श्रीदेवीसोबत मला काम करायला मिळाले हे माझे सौभाग्य असेही जयाप्रदा म्हणाल्या. श्रीदेवीची जागा कुणीही घेऊ शकत नाही. ती आपल्या मुलींची देखरेख करणारी चांगली आई होती. मुलगी जान्हवीला त्यांना आपल्याप्रमाणेच एक यशस्वी अभिनेत्री झालेली पाहायचे होते. परंतू मुलीचा पहिला चित्रपट पाहण्यापुर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला."

 

अभिनेता कृष्णम राजू म्हणाला की, मी चार-पाच चित्रपटात श्रीदेवीसोबत काम केले. ती नेहमी मला सर म्हणायची आणि सिनियर लोकांचा खुप सन्मान करायची. येवढेच काय ती श्रीदेवी मोठ्या व्यक्तीसमोर बसतही नसे. श्रीदेवीच्या 'लम्हे' आणि 'चांदनी' चे सहनिर्माता सुब्बारामी रेड्डीने त्यांच्यासोबत घालवलेल्या आठवणी सांगितल्या. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रध्दांजली सभेचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...