आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Student Of The Year Actress Tara Sutaria Dating Veteran Bollywood Actor Vinod Mehra Son Rohan Mehra

टायगरसोबत SOTY-2 मध्ये रोमान्स करणार ही अॅक्ट्रेस, या स्टारकिडला करतेय डेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः गायिका आणि अभिनेत्री तारा सुतारिया लवकरच टायगर श्रॉफसोबत 'स्टूडेंट ऑफ द इयर-2'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. बुधवारी चित्रपटातील स्टारकास्टचा पहिला लूक रिव्हील करण्यात आला. या चित्रपटातून अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अनन्यासोबत टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया हे दोघे झळकणार आहेत. टायगरला सगळेच ओळखतात. तर अनन्या स्टारकिड आहे. पण तारा इंडस्ट्रीतून नाही. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला तारा कोण आहे, याची खास माहिती देत आहोत. 


विनोद मेहरांच्या मुलाला डेट करतेय तारा...  
- 'स्टुडंट ऑफ द इयर-2'मध्ये टायगर श्रॉफसोबत ऑन स्क्रिन रोमान्स करणारी तारा ख-या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये आहे. दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांचा मुलगा रोहन मेहरासोबत तारा रिलेशनशिपमध्ये आहे.

- ताराप्रमाणेच रोहनसुद्धा यावर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.
- रोहन सैफ अली खानसोबत 'बाजार' या चित्रपटात झळकणार आहे. येत्या 27 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 
- तारा आणि रोहन 2015 पासून डेट करत आहेत. पार्टीपासून अनेक सणावारांना हे दोघे एकत्र दिसत असतात. दोघांच्याही इंस्टाग्राम अकाउटंवर त्यांचे एकत्र फोटोज बघायला मिळतात.
- धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती आणि पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित ताराचा डेब्यू चित्रपट यावर्षी 23 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

 

टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत आहे तारा...
- 22 वर्षीय तारा अभिनेत्रीसोबतच एक गायिका आणि बेलेट डान्सर आहे. डिस्नेच्या 'The Suite Life of Karan & Kabir', 'Oye Jassie' या शोजमध्ये तारा झळकली आहे.
- परदेशात अनेक ठिकाणी सोलो कॉन्सर्टमध्ये तिने परफॉर्म केले आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, तारा सुतारियाचे बॉयफ्रेंड रोहन मेहरासोबतचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...