आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

....म्हणून सनीने पहिल्यांदाच शेअर केला लग्नाचा फोटो, अशी सुरु झाली होती Love Story

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा नवरा डेनियल वेबर यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून त्यांच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. 11 एप्रिल 2011 रोजी पंजाबी पद्धतीने सनी आणि डेनियल साताजन्माच्या गाठीत अडकले होते. आजच्या या खास दिवसाचे औचित्य साधत सनीने पहिल्यांदाच तिच्या लग्नाचा फोटो शेअर करुन नव-यासाठी खास मेसेज दिला आहे. सनीने शेअर केलेल्या या छायाचित्रात ती पंजाबी वधूच्या रुपात अतिशय सुंदर दिसतेय. फोटो शेअर करुन

 

सनीने लिहिले, "सात वर्षांपूर्वी आपण देवासमोर एकमेकांवर नेहमी प्रेम करणार असल्याची शपथ घेतली होती. आज मी तुझ्यावर पुर्वीपेक्षाही अधिक प्रेम करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा."


तर डेनियलनेदेखील सनीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करुन तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तू माझे सर्वस्व आहेस, असे डेनियलने म्हटले आहे. 


आज सनी आणि डेनियल यांच्या लग्नाच्या सातव्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात, हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले आणि त्यांचे हे नाते लग्नाच्या मंडपापर्यंत कसे पोहोचले... 

बातम्या आणखी आहेत...